नवी दिल्ली | आयपीएल 16 व्या मोसमातील 50 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स टीमने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. आरसीबीने दिल्लीला विजयासाठी 182 धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात 16.4 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. दिल्लीकडून विकेटकीपर बॅट्समन फिलीप सॉल्ट याने 45 बॉलमध्ये सर्वाधिक 87 धावांची खेळी केली. सॉल्टने या खेळीत 8 चौकार आणि 6 सिक्स खेचले. सॉल्ट व्यतिरिक्त कॅप्टन डेव्हिड वॉर्नर याने 22 आणि मिचेल मार्श याने 26 धावांचं योगदान दिलं. तर रायली रुसो आणि अक्षर पटेल याने जोडीने दिल्लीला विजयापर्यंत पोहचवलं. रायलीने नाबाद 35 धावांची निर्णायक खेळी केली. तर अक्षरने नॉट आऊट 8 धावा करत चांगली साथ दिली. आरसीबीकडून जोश हेझलवूड, कर्ण शर्मा आणि हर्षल पटेल या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दिल्ली कॅपिट्ल्सचा हा या मोसमातील चौथा विजय ठरला. विशेष बाब म्हणजे दिल्लीने गेल्या 5 सामन्यात हे 4 विजय मिळवले आहेत. दिल्लीच्या विजयाने पॉइंट्स टेबलमध्ये प्लेऑफ क्वालिफायसाठीची चुरस आणखी वाढली आहे. दरम्यान दिल्ली विरुद्ध आरसीबी हा सामना सौरव गांगुली विरुद्ध विराट कोहली असादेखील होता. दिल्ली विरुद्ध आरसीबी या मोसमातील गेल्या सामन्यात विराटने गांगुलीसोबत हस्तांदोलन टाळलं होतं. त्यामुळे या 6 मे रोजीच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष होतं.
विराट-गांगुली हस्तांदोलन
All is well. Virat Kohli and Ganguly shake hands.#IPL2O23 #RCBvsDC #ViratKohli #SouravGanguly pic.twitter.com/21cboYqb0d
— Cricket Sledging (@CricketSledging) May 6, 2023
या सामन्यात दिल्लीने घरच्या मैदानात आरसीबीवर विजय मिळवला. त्यानंतर नेटकऱ्यांनी सौरव गांगुली याला डोक्यावर घेत विराट कोहलीला डिवचण्यासाठी मीम्स शेअर केले आहेत. सौरव गांगुलीने आरसीबीवर विजय मिळवल्यानंतर लॉर्डस क्रिकेट ग्राउंडप्रमाणे इथेही दिल्लीच जर्सी काढून सेलिब्रेशन केल्याचं मीम व्हायरल केलंय. यासह असे अनेक मीम्स आता व्हायरल झाले आहेत.
आरसीबीच्या पराभवानंतर मीम्सचा महापूर
Saurav Ganguly should recreate this on the balcony of Jaitley Stadium after Delhi Capital's victory ✌️
Do it mann @SGanguly99 pic.twitter.com/eiOaXO6KV0
— ` Frustrated CSKian (@kurkureter) May 6, 2023
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, मनीष पांडे, अमन हकीम खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केदार जाधव, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवूड.