IPL 2024 साठी केकेआरने खेळली मोठी चाल, वाघाची संघात पुन्हा एन्ट्री

| Updated on: Nov 22, 2023 | 1:25 PM

Kolkata Knight Riders New Mentor : येत्या आयपीएलसाठी सर्व टीम आतापासूनच तयारीला लागल्याचं दिसत आहे. अशातच केकेआरने मोठा बदल केलेला पाहायला मिळाला असून त्यांच्या ताफ्यात घातक खेळाडूची एन्ट्री झालीय.

IPL 2024 साठी केकेआरने खेळली मोठी चाल, वाघाची संघात पुन्हा एन्ट्री
Follow us on

मुंबई : IPL 2024 ला काही महिने बाकी रााहिले असताना केकेआरने मोठा बदल केला आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यामध्ये जिगरबाज खेळाडू परतला आहे. केकेआरला दोन विजेतेपद मिळवून देणारा हा खेळाडू माघारी परतल्याने संघाची ताकद आणखी वाढली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून माजी कर्णधार गौतम गंभीर आहे. गौतमने लखनऊ सुपर जायंट्स संघाची साथ सोडली असून तो परत एकदा कोलकाता संघासोबत जोडला गेला आहे.

गौतम गंभीरची पोस्ट

मी माघारी परतलो आहे, मी जास्त भावनिक माणूस नाही, अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे मी प्रभावित होत नाही. मी पुन्हा त्याच ठिकाणी आलोय जिथून सर्व काही सुरू झालं होतं. आता परत एकदा ती जर्सी परिधान करण्याचा विचार मनात आला तरी मला आनंद होत आहे. मी काही फक्त केकेआरमध्ये माघारी आलो नाही तर जॉय सिटीमध्ये माघारी परतत असल्याचं गौतम गंभीर याने म्हटलं आहे.

 

 

गंभीरकडे मोठी जबाबदारी

कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मेंटॉरपदी निवड करण्यात आली आहे. लखनऊ संघातून बाहेर पडल्याची घोषणा केल्यावर काही वेळातच त्याने केकेआरच्या मेंटॉरपदी निवड झाल्याची घोषणा केली आहे. वर्ल्ड कप झाल्यावर सर्व क्रिकेट चाहते आता येत्या आयपीएलची वाट पाहत आहेत. त्याआधी सर्व टीम तयारीला लागल्याचं दिसत आहे.

दरम्यान , गंभीर हा केकेआर फॅमिलीचा भाग राहिला असून मार्गदर्शकाच्या भूमिकेत आमचा कॅप्टन माघारी येत असल्याचं शाहरूख खान याने पोस्ट करत म्हटलं आहे. केकेआरचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित, सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि जेम्स फॉस्टर आहेत. तर भरत अरुण हे संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत.