मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना होऊन तीन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. अंतिम सामन्यातील पराभवानंतर एका झटक्यात क्रिकेट फिव्हर संपुष्टात आलं. सलग दहा सामने जिंकत टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली होती. पण शेवटच्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर भारतीयांचा हिरमोड झाला. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना तर अश्रू अनावर झाले. पराभवाने खचलेल्या खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खुद्द ड्रेसिंग रुममध्ये गेले आणि त्यांनी सांत्वन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीचं संघातील खेळाडू आणि क्रीडारसिकांनी स्वागत केलं. पण राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली होती. निवडणूक प्रचार रॅलीत पनौती या शब्दाचा वापर केला होता. त्यामुळे राजकारण चांगलंच तापलं होता. आता या शब्दाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर याने समाचार घेतला आहे. यावेळी त्याने माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचाही संदर्भ दिला.
“पनौती हा शब्द खरंच खूप वाईट आहे. हा शब्ध कोणाविरुद्ध वापरू नये. खासकरून देशाच्या पंतप्रधानाविरुद्ध तरी नाहीच. 2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्या फेरीचा सामना पाहण्यासाठी मनमोहन सिंह उपस्थित होते. पाकिस्तान विरुद्ध हा सामना मोहलीत पार पडला होता. जर तो सामना आम्ही गमवला असता तर ते भेटायला असते आणि त्यात काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही.”, असं गौतम गंभीर याने एएनआयशी बोलताना सांगितलं.
EP-120 with Gautam Gambhir premieres on Saturday at 5 PM IST
"No one can come and walk over my players," Gautam Gambhir on Naveen-ul-Haq controversy#ANIPodcastwithSmitaPrakash #GautamGambhir #Dhoni
Tune in here: https://t.co/LLgzRg3fCS pic.twitter.com/mHhRROyn4S
— ANI (@ANI) December 8, 2023
“तो टीव्हीवर येतो आणि हिंदू मुस्लिम बोलतो आणि क्रिकेट सामने पाहण्यासाठी जातो. आपले खेळाडू हा सामना जिंकले असते पण पनौती तिथे असल्याने आपण सामना गमावला.”, असं राहुल गांधी राजस्थानच्या प्रचार रॅलीत बोलले होते. त्यानंतर सोशल मीडियावर राहुल गांधींविरोधार रान पेटलं होतं. माजी केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी या टीकेचा चांगलाच समाचार घेतला होता.