गौतम गंभीरवर रॅपिड फायर, भारताचा मोठा खेळाडू कोण? ना तेंडुलकर, ना विराट याचं घेतलं नाव?

| Updated on: Sep 08, 2023 | 10:03 AM

गौतम गंभीर याला एका मुलाखतीमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फलंदाज कोण वाटतो याबाबत त्याला विचारण्यात आल. यावर उत्तर देताना गौतमने सुनील गावसकर, महेंद्रसिंग धोनी ना विराट कोहली यांच्यामधील कोणाचंही नाव घेतलं नाही.

गौतम गंभीरवर रॅपिड फायर, भारताचा मोठा खेळाडू कोण? ना तेंडुलकर, ना विराट याचं घेतलं नाव?
gautam gambhir
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि खासदार गौतम गंभीर आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असलेला पाहायला मिळतो. आशिया कपमध्ये महेंद्र सिंह धोनीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तो परत एकदा चर्चेत आला होता. आता गौतम गंभीर याला एका मुलाखतीमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फलंदाज कोण वाटतो याबाबत त्याला विचारण्यात आल. यावर उत्तर देताना गौतमने सुनील गावसकर, महेंद्रसिंग धोनी ना विराट कोहली यांच्यामधील कोणाचंही नाव घेतलं नाही. पाहा मग गंभीरने कोणत्या खेळाडूचं नाव घेतलं.

काय म्हणाला गौतम गंभीर?

डॉ. विवेक बिंद्रा यांनी यूट्यूब चॅनेलवरील शोमध्ये बोलताना गौतम गंभीर याला रॅफिड फायरमध्ये आतापर्यंतचा महान फलंदाज कोण? असं विचारलं. यावेळी त्याला विराट कोहली, सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर असे तीन पर्याय दिले होते. यामधील गौतम गंभीर याने तिघांचीही निवड नाही केली. गौतम गंभीरने वेगळ्याच खेळाडूचं नाव घेतलं.

गौतम गंभीर याने त्याला महान वाटत असलेला खेळाडू युवराज सिंह असल्याचं सांगितलं. युवराज सिंह याने 2007 साली T20 वर्ल्ड कप आणि 2011 वन डे वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. युवराज 2011 साली ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराचा मानकरी ठरला होता. गौतम गंभीर यानेही दोन्ही वर्ल्ड कप फायनल सामन्यामध्ये 75 आणि 97 धावा केल्या होत्या. सचिन तेंडुलकर, झहीर खान, धोनी यांना जितकं वर्ल्ड कप विजयाचं श्रेय दिलं तेवढं युवराज सिंहला श्रेय दिलं गेलं नाही.

दरम्यान, युवराज सिंह याने भारतासाठी 304 सामन खेळले असून 8701 धावा त्याने केल्या आहेत. यामध्ये त्याने 14 शतके केली आहेत तर 111 विकेट्स घेतल्या आहेत. त्यासोबतच 58 टी-20 सामने खेळले असून 1117 धावा केल्या आहेत, तर 28 बळी घेतले आहेत. 40 कसोटींमध्ये 33.93 च्या सरासरीने 1900 धावा केल्यात. ज्यामध्ये तीन शतकांचा समावेश आहे.