Gautam Gambhir : खासदार असूनही IPLमध्ये मेंटॉर का? नेटिझन्सच्या प्रश्नावर गौतमचं हटके उत्तर, काय म्हणाला वाचा

| Updated on: Jun 04, 2022 | 7:43 PM

गौतम गंभीरवर खासदार होऊनही क्रिकेटशी निगडित असल्याबद्दल खूप टीका केली जाते.

Gautam Gambhir : खासदार असूनही IPLमध्ये मेंटॉर का? नेटिझन्सच्या प्रश्नावर गौतमचं हटके उत्तर, काय म्हणाला वाचा
गौतम गंभीर, माजी क्रिकेटपटू
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई :  माजी क्रिकेटपटू आणि सध्या खासदार असलेला गौतम गंभीर (Gautam Gambhir) आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये लखनौ सुपर जायंट्ससोबत (LSG) होते. गौतम गंभीरवर अनेकदा नेटिझन्सकडून खासदार असण्यावरुन निशाणा साधण्यात आलाय. गंभीरला अनेकदा यावरुन लक्ष करण्यात आलंय. भारताच्या सर्वेत्कृष्ट खेळाडू असलेल्या गंभीरविषयी खासदारकी आणि क्रिकेट यांसंदर्भात जेव्हाही चर्चा होते तेव्हा लगेच त्या चर्चांची बातमी होते. कारण, गंभीर क्रिकेट आणि खासदारकीमध्ये दोन्हीकडे समतोल साधताना दिसून येतो. तो खासदार असला तरी गौतम आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये मेंटॉर होता. खासदर असल्यानं आपल्या राजकीय जबाबदारीसह त्याने क्रिकेटकडे दुर्लक्ष न करता, आजही स्वत:ला तितकंच तत्पर ठेवलंय. मात्र, यावरुन नेटिझन्सनं पुन्हा एकदा गंभीरला लक्ष्य केलंय.

कधी कॉमेंट्री तर कधी मेंटॉर

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गंभीर पूर्व दिल्लीतून विजयी झाला. निवडणूक जिंकल्यानंतरही तो क्रिकेटच्या मॅचमध्ये दिसत राहतो. कधी तो सामन्यांमध्ये कॉमेंट्री करताना दिसतो तर कधी मेंटरच्या भूमिकेत. आयपीएल 2022 च्या नवीन संघ, लखनौ सुपर जायंट्सने गंभीरला आपला मार्गदर्शक बनवले होते.

हे सुद्धा वाचा

ट्रोलच्या निशाण्यावर आला

गौतम गंभीरवर खासदार होऊनही क्रिकेटशी निगडित असल्याबद्दल खूप टीका केली जाते. यावेळी तो ट्रोलच्या निशाण्यावर आला आहे. यासोबतच विरोधी पक्षही त्यांच्यावर सवाल करत आहेत. आता 2011 विश्वचषक फायनल आणि 2007 टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतासाठी सर्वात मोठी इनिंग खेळणाऱ्या गौतम गंभीरनं याचं उत्तर दिलंय.

नेटिझन्सला चोख प्रत्युत्तर दिलं

गौतम गंभीरनं आयपीएलमध्ये काम करण्यावर आपली प्रतिक्रिया देत नेटिझन्सला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. गौतम म्हणाला, ‘मी आयपीएलमध्ये काम करतो कारण मी 5 हजार लोकांसाठी दरवर्षी 2.75 कोटी रुपये खर्च करतो. हे सर्व पैसे मी माझ्या खिशातून खर्च करतो. मी आयपीएलमध्ये काम करतो हे सांगायला मला लाज वाटत नाही. हे मी करत असलेल्या सर्व गोष्टींचे अंतिम ध्येय आहे. वाचनालय बांधण्यासाठी मी 25 लाख रुपये खर्च केले आहेत.

लखनौच्या कामगिरीचे श्रेय गंभीरला

आयपीएलमध्ये प्रथमच खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सनं अप्रतिम कामगिरी केली. या संघाने गुणतालिकेत तिसरं स्थान पटकावलं आणि प्लेऑफमध्येही पोहोचले. जिथे तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध हरला. संघाच्या कामगिरीचं श्रेय मोठ्या प्रमाणावर गौतम गंभीरला दिलं जातंय. गंभीरनं कर्णधार म्हणून दोन वेळा कोलकाता नाईट रायडर्ससाठी आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.