मुंबई : वुमन्स प्रीमिअर लीग 2024 मधील सातव्या सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सुरू आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यामध्ये दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 194-5 धावा केल्या आहेत. ओपनर लेडी सेहवाग म्हणून ओळखली जाणारी शेफाली वर्मा हिने आक्रमक अर्धशतकी खेळी केली. या सामन्यामध्ये बंगळुरूच्या खेळाडूने कडक फिल्डिंग केलेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आरसीबीचा 360 डिग्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या ए बी डिव्हिलयर्सची सर्वांना आठवण झाली.
THE BEST FIELDING MOMENT IN WPL 2024. 🤯🔥
– This reminds of ABD save for RCB.pic.twitter.com/ske8MshaTW
— Johns. (@CricCrazyJohns) February 29, 2024
सामन्याच्या 11 ओव्हरमध्ये शेफाली वर्माने मारलेला बॉल सिक्सच जाणार होता. मात्र बॉऊंड्रीजवळ जॉर्जिया वेरहॅमने ही भिंत बनून उभी होती. बॉल बाहेर पडणार तितक्यात वेरहॅमने उडी मारत बॉल पकडला पण ती बॉऊंड्रीबाहेर जात असल्याचं लक्षात येताच तिने बॉल आतमध्ये फेकला. शेफालीच्या नावावर सहा धावा फिक्स होत्या पण तिला फक्त दोनच धावा मिळाल्या. जॉर्जिया वेरहॅमची फिल्डिंग पाहून सर्वांना ए बीची आठवण झाली. त्यानेही अशाच प्रकारची फिल्डिंग केलेली पाहायला मिळाली होती. आरसीबीचा सपोर्ट स्टाफ आणि डगआउटमध्ये बसलेल्या खेळाडूंनीही उभ राहून टाळ्या वाजवल्या.
दरम्यान, शेफालीने 161.29 च्या स्ट्राईक रेटने 31 चेंडूत 50 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 4 शानदार षटकार मारले. जॉर्जिया वेरहॅमला श्रेयंका पाटीलने झेलबाद केले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 5 गडी गमावून 194 धावा केल्या. एलिस कॅप्सीने 46 धावांची नाबाद खेळी आणि एस जोनासेनने 16 चेंडूत 36 धावांची नाबाद खेळी खेळली.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲलिस कॅप्सी, मारिझान कॅप, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, सभिनेनी मेघना, नदिन डी क्लर्क, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.