मुंबई: वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत बांगलादेश विरुद्ध श्रीलंका हा सामना चर्चेत राहिला. त्याला कारण म्हणडे अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट झाल्याचं..त्यानंतर बरोबर एका महिन्यानंतर बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात ऑब्स्ट्रॅक्टिंग द बॉल विकेटची चर्चा रंगली. अशा सर्व घडलं असताना त्यात आता नव्या वादाची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा नव्या चर्चेला उधाण आलं आहे. एसीटी प्रीमियल क्रिकेटदरम्यान ही आश्चर्यकारक घटना घडली. यात फलंदाजाला क्लिन बोल्ड करूनही नाबाद देण्यात आलं. यात गोलंदाजांने नो बॉल वगैर असं काहीच टाकलं नाही. तसेच डेड बॉलचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे असं काय झालं की फलंदाजाला आऊट दिलं नाही असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. कारण बोल्ड होऊनही बेस्ट स्टंपवर तश्याच होत्या त्यामुळे त्याला नाबाद घोषित करण्यात आलं.
गिन्निंदरा क्रिकेट क्लब आणि वेस्ट डिस्ट्रिक्ट संघ यांच्यात सामना होता. गिन्निंदराचा वेगवान गोलंदाज अँडी रेनॉल्डसने वेस्ट डिस्ट्रिकच्या मॅथ्यू बोसस्टोला क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर खेळाडूंनी मैदानात जल्लोष साजरा केला. पण झालं असं की बेल्स स्टंपवर होत्या तशाच होत्या. त्यामुळे सर्वच जण गप्प झाले. कॅनबरा टाईम्सच्या रिपोर्टनुसार फलंदाज तंबूच्या दिशेने मार्गस्थ झाला होता. जेव्हा बेल्स न पडल्याचं त्याला कळलं तेव्हा तो पुन्हा क्रिजवर आला.
Things you don't see every day…
Explain this one from a Ginninderra-Wests game for us, cricket fans – how was this possible?
Physics? Chewing Gum? Swollen timber in all the rain?" 🤔
📷 Wal Murdoch pic.twitter.com/484qFEt1Wj
— Cricket ACT (@CricketACT) December 10, 2023
पंचांमध्ये याबाबत बरीच खलबतं झाली. पण क्रिकेट नियमानुसार बोसस्टोला नाबाद घोषित करण्यात आलं. मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या २९.२२ च्या नियमानुसार, स्टम्प पडल्यानंतरही कमीत कमी एक बेल्स जमिनीवर पडणं आवश्यक आहे. किवा एकापेक्षा जास्त स्टप्स पडणं गरजेचं आहे.
वेस्ट डिस्ट्रिक्टचा कर्णधार सॅम व्हाईटमॅन याने नंतर सांगितलं की, “मी यापूर्वी कधीच असं पाहिलं नव्हतं. स्टम्प उडाल्यानंतर आम्ही सर्वत खूश झालो होतो. पण फलंदाज परत आल्याने आमच्या आनंदावर विरजण पडलं. काही वेळानंतर त्याला पुन्हा बाद केलं. त्यानंतर कुठे आम्हाला आनंद झाला.”