ipl 2024 सुरू होण्याआधी ‘या’ मोठ्या संघाला तगडा झटका, स्टार खेळाडू दुखापग्रस्त

| Updated on: Dec 08, 2023 | 10:09 PM

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीगला सुरूवात व्हायला अवघे काही महिने बाकी आहेत. मात्र त्याआधी बिग बॅश लीगमध्ये स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने आयपीएलमधील संघाच्या अडचणीतही वाढ झाली आहे. कारण संघासाठी धक्का मानला जात आहे. कोण आहे तो स्टार खेळाडू जाणून घ्या.

ipl 2024 सुरू होण्याआधी या मोठ्या संघाला तगडा झटका, स्टार खेळाडू दुखापग्रस्त
Follow us on

मुंबई : आयपीएल 2024 सुरू व्हायला अवघे काही महिने बाकी आहेत. येत्या 19 डिसेंबरला आयपीएलचा लिलाव पार पडला जाणार आहे. आयपीएल ट्रेडिंगमध्ये अनेक खेळाडूंची अदलाबदल झालेली पाहायला मिळाली. गुजरात टायटन्स संघाचा कर्णधारच मुंबई इंडियन्सने ट्रेड केला. इतर संघांमधीलही खेळाडू बदलले मात्र सर्वात जास्त मोठा धक्का देणारा ट्रेड हार्दिक पंड्या याचा ठरला. यावरून दिसतं की सर्व फ्रँचायजी संघ बांधणीला लागले आहेत. येत्या लिलावामध्येही फ्रँचायझी पाण्यासारखा पैसा सोडतील. मात्र त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाला असल्याने आयपीएलमधील संघासाठी मोठा झटका मानला जात आहे.

कोण आहे तो खेळाडू?

बिग बॅश लीगमधील पहिला सामना ब्रिस्बेन हीट संघाने मेलबर्न स्टार्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करणारा ग्लेन मॅक्सवेल 14 बॉलमध्ये 23 धावांवर खेळत होता. मात्र चालू सामन्यामध्ये त्याला दुखापत झाली त्यानंतर तो काही वेळातच आऊट झाला. आऊट झाल्यावर डगआऊटमध्ये त्याच्या हाताला बर्फ लावत होते. या सामन्यादरम्यान मेलबर्न स्टार्सचा गोलंदाज नॅथन कुल्टर-नाईलच्या फिटनेसबाबत मेलबर्न स्टार्सही चिंता आहे.दुखापतीनंतर त्याचं स्कॅनिंग करण्यात आलं.

दरम्यान, मॅक्सवेल याची दुखापत लवकर बरी नाही झाली तर आयपीएलमध्ये आरसीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. आरसीबीचा मेन हिटर असलेल्या ग्लेन मॅक्सेवलकडे यंदा मोठी जबाबदारी असणार आहे. वर्ल्ड कपमध्ये द्विशतकी खेळी करणारा मॅक्सवेल यंदाच्या आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो  याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.