SL vs AUS : ग्लेन मॅक्सवेल जोरात, दमदार खेळीनं ऑस्ट्रेलियाचा विजय, पहिल्या वनडेत श्रीलंका पराभूत

| Updated on: Jun 15, 2022 | 12:31 PM

अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर 300 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं.

SL vs AUS : ग्लेन मॅक्सवेल जोरात, दमदार खेळीनं ऑस्ट्रेलियाचा विजय, पहिल्या वनडेत श्रीलंका पराभूत
ग्लेन मॅक्सवेल जोरात
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या T20 मध्ये दासुन शनाकाच्या दमदार खेळीमुळे श्रीलंकेने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयाची नोंद करून चांगली सुरुवात केली. मात्र, पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (pallekele stadium) झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियानं (AUS) श्रीलंकेवर (SL) 2 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना गुनाथिलक्रून, पाथुम निसांका, कुसल मेंडिस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर 300 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. पावसामुळे अडचणीत सापडलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ-लुईस नियमानुसार 44 षटकात 282 धावा करण्याचं लक्ष्य मिळालं होतं. त्याला त्यांनी पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने जिंकून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. सलामीवीर दानुष्का गुनाथिलका आणि पथुम निसांका यांनी श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी झाली. पण दोन्ही फलंदाजांनी अवघ्या दोनच्या फरकानं विकेट गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन करता आलं. गुणथिलका 55 आणि निसांका 56 धावा करून बाद झाले.

आयसीसीचे ट्विट पाहा

मेंडिसचे 87 चेंडूंत 8 चौकार

कुसल मेंडिसने डावाची धुरा सांभाळली. मेंडिससह अस्लंका (37) आणि शेवटी हसरंगा (37) यांनी संघाला 300 धावांपर्यंत मजल मारली. कुसल मेंडिसने 87 चेंडूंत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 86 धावा केल्या.ऑस्ट्रेलियाकडून आगर आणि लॅबुशेनने 2-2 तर झ्ये रिचर्डसन आणि हेझलवूडने 1-1 बळी घेतले.

वॉर्नर तीन चेंडू खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला

दुसरीकडे पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला 44 षटकांत 282 धावा करण्याचं लक्ष्य मिळालं होतं. ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तीन चेंडू खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार फिंचही पावसामुळे सामना थांबण्यापूर्वी 41 चेंडूत 44 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

51 चेंडूत 80 धावांची दमदार खेळी

त्यानंतर मात्यामुळे ऑस्ट्रेलियावर काहीवेळ दबाव होता. त्यानंतर कॅरी आणि स्टेनिशने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला पण स्टेनिशही 31 चेंडूत 44 धावा करून बाद झाला. यानंतर ग्लेन मॅक्सवेलनं एक टोक पकडून 51 चेंडूत 80 धावांची दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

300 धावांचं मोठं लक्ष्य

प्रथम फलंदाजी करताना गुनाथिलक्रून, पाथुम निसांका, कुसल मेंडिस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर 300 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. पावर्शन लॅबुशेन आणि स्मिथने डावाची धुरा सांभाळली. पण हे दोघेही काही चेंडूंच्या फरकाने बाद झाले, सामुळे अडचणीत सापडलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ-लुईस नियमानुसार 44 षटकात 282 धावा करण्याचं लक्ष्य मिळालं होतं. त्याला त्यांनी पूर्ण केलं