कॅनडा | कॅनडात सध्या ग्लोबल टी 20 लीग क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. या टी 20 लीगमध्ये पाकिस्तानच्या आफ्रिदीने धुमशान घातलंय. आफ्रिदीने हॅटट्रिकसह 5 विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघाला झटक्यात बॅकफुटवर ढकललं. व्हँकुव्हर नाइट्स विरुद्ध मॉन्ट्रियल टायगर्स यांच्यात 5 ऑगस्ट रोजी क्वालिफायर 2 सामना खेळवण्यात आला. या आरपारच्या सामन्यात आफ्रिदीने ही चमकदार कामगिरी केली.
मॉन्ट्रियल टायगर्सकडून खेळताना 22 वर्षीय अब्बास आफ्रिदीने हॅटट्रिकसह 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला. मॉन्ट्रियल टायगर्सने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. अब्बासच्या भेदक माऱ्यासमोर व्हँकुव्हर नाइट्स टीमला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 137 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात मॉन्ट्रियल टायगर्सने 3 बॉलआधी 1 विकेटने सामना जिंकला आणि फायनलमध्ये धडक मारली.
अब्बास आफ्रिदी याने व्हँकुव्हर नाइट्सच्या डावातील 13 व्या ओव्हरमध्ये हॅटट्रिक घेत सामना पलटवला. अब्बासने या 13 व्या ओव्हरमधील शेवटच्या 3 बॉलवर विकेट्स घेत हॅटट्रिक पूर्ण केली. अब्बासने व्हँकुव्हर नाइट्स टीमच्या कॉर्बिन बॉश, कॅप्टन सी व्हॅन डर डुसेन आणि नजीबुल्ला झद्रान या तिघांना आऊट करत हॅटट्रिक घेतली. त्यामुळे
व्हँकुव्हर नाइट्स टीमची 2 बाद 90 वरुन 5 बाद 90 अशी स्थिती झाली.
अब्बास आफ्रिदी हॅटट्रिक
Bosch ✅ Rassie ✅ Najib ✅
Abbas Afridi removes the backbone of the Knights within 3 deliveries ?#GT20Canada #GT20Season3 #GlobalT20 #CricketsNorth #GT20Playoffs #VKvMT pic.twitter.com/cToYDhEeUH
— GT20 Canada (@GT20Canada) August 5, 2023
अब्बासने घेतलेल्या या हॅटट्रिकमुळे व्हँकुव्हर नाइट्सचा डाव गडगडला. व्हँकुव्हर नाइट्सला त्यानंतर पुढील 7 ओव्हरमध्ये फक्त 47 धावाच करता आल्या. त्यामुळे व्हँकुवरने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 137 धावा केल्या. अब्बासने 4 ओव्हर्सच्या स्पेलमध्ये 7.20 च्या इकॉनॉमी रेटने 29 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.
व्हँकुव्हर नाइट्स प्लेईंग इलेव्हन | रॅसी व्हॅन डर डुसेन (कॅप्टन), रेयान पठाण, मोहम्मद रिझवान, कॉर्बिन बॉश, वृत्य अरविंद, हर्ष ठाकर, नजीबुल्ला झद्रान, फॅबियन ऍलन, रविंदरपाल सिंग, रुबेन ट्रम्पेलमन आणि जुनैद सिद्दिकी.
मॉन्ट्रियल टायगर्स प्लेईंग इलेव्हन | ख्रिस लिन (कर्णधार), मुहम्मद वसीम, श्रीमंथा विजेरत्ने (विकेटकीपर), दीपेंद्र सिंग आयरी, शेरफेन रदरफोर्ड, दिलप्रीत सिंग, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रॅथवेट, कलीम सना, अयान अफजल खान आणि अब्बास आफ्रिदी.