Video | पृथ्वी शॉ याचं नशिबच फुटकं, क्रिकेटरचा व्हीडिओ व्हायरल

| Updated on: Aug 05, 2023 | 12:01 AM

Prithvi Shaw Video | पृथ्वी शॉ गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. पृथ्वी टीम इंडियात कमबॅकसाठी प्रयत्न करतोय.

Video | पृथ्वी शॉ याचं नशिबच फुटकं, क्रिकेटरचा व्हीडिओ व्हायरल
Follow us on

मुंबई | स्टार ओपनर बॅट्समन पृथ्वी शॉ हा सध्या टीम इंडियातून गेल्या काही महिन्यांपासून बाहेर आहे. पृथ्वीला आयपीएल 16 व्या मोसमातही आपली छाप सोडता आली नाही. पृथ्वी मैदानात सपशेल अपयशी ठरलाय. तर पृथ्वी क्रिकेटपेक्षा वादांमुळे चर्चेत आहे. पृथ्वी टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळतोय. मात्र तिथेही पृथ्वी फ्लॉप ठरलाय. पृथ्वी आपल्या पदार्पणातील सामन्यात फ्लॉप ठरला. पृथ्वी विचित्र पद्धतीने आऊट झाला. पृथ्वीचा आऊट झाल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

पृथ्वी नॉर्थहॅम्प्टनशायर काउंट क्लबचं प्रतिनिधित्व करतोय. पृथ्वीची काउंटी क्रिकेटमधील सुरुवात निराशाजनक राहिली. पृथ्वी पहिल्याच सामन्यात झटपट आऊट झाला

ग्लुसेस्टरशायर विरुद्ध नॉर्थहॅम्प्टनशायर आज (4 ऑगस्ट) आमनेसामने होते. शॉने या सामन्यातून इंग्लिश क्रिकेटमध्ये डेब्यू केलं. ग्लुसेस्टरशायरने नॉर्थहॅम्प्टनशायरला विजयासाठी 279 धावांचं आव्हान दिलं होतं. नॉर्थहॅम्प्टनशायरकडून पृथ्वी सलामीला आला. ग्लुसेस्टरशायरने सुरुवातीपासून नॉर्थहॅम्प्टनशायरला धक्के दिले. मात्र पृथ्वी एक बाजू धरुन होता. मात्र पृथ्वी दुर्देवीरित्या बाद झाला.

ग्लुसेस्टरशायरकडून नेदरलँडचा बॉलर पॉल मीकरन 16 वी ओव्हर टाकायला आला. मीकरनने या ओव्हरमधील शेवटच्या बॉल बाऊन्सर टाकला. पृथ्वीने हा बाऊन्सर पूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात पृथ्वी अपयशी ठरला आणि पीचवर आपटला. पृथ्वी खाली पडताच त्याचा पाय हा स्टंप्सवर लागला आणि हिट विकेट आऊट झाला. पृथ्वीने 35 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 2 फोरसह 34 धावांची खेळी केली.

पृथ्वी शॉ हीट विकेट

ग्लुसेस्टरशायर प्लेइंग इलेव्हन | ख्रिस डेंट, जो फिलिप्स, ऑलिव्हर प्राइस, जेम्स ब्रेसी (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॅक टेलर, ग्रॅमी व्हॅन बुरेन, जफर गोहर, अन्वर अली, अजित डेल, टॉम प्राइस आणि पॉल व्हॅन मीकरेन.

नॉर्थहॅम्प्टनशायर प्लेइंग इलेव्हन | लुईस मॅकमॅनस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, एमिलियो गे, रिकार्डो वास्कोनसेलोस, सॅम व्हाईटमन, ल्यूक प्रॉक्टर, रॉब केओघ, टॉम टेलर, बेन सँडरसन, फ्रेडी हेल्ड्रेच आणि जॅक व्हाईट.