डोळ्यावर गॉगल, पायात चप्पल… विराट आणि हार्दिकचा खतरनाक स्वॅग!

| Updated on: Sep 18, 2022 | 8:57 PM

तुम्हाला विराट कोहली आणि हार्दिक-पांड्याचा अलग अंदाज दिसून शकतो. एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. यात विराट आणि हार्दिक पांड्या डान्स करताना दिसून येताय. हा व्हिडीओ नक्की पाहा.

डोळ्यावर गॉगल, पायात चप्पल... विराट आणि हार्दिकचा खतरनाक स्वॅग!
विराट आणि हार्दिकचा भलताच स्वॅग!
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : विराट (Virat Kohli) भाऊ सध्या चांगलेच फॉर्ममध्ये आहे. विराटकडून आशा देखील वाढल्या आहेत. आशिया चषकात (Asia Cup 2022)  त्यानं शतक ठोकून (Virat Kohli Century) पुन्हा चाहत्यांना खुश केलंय. पण, आता त्याला ऑस्ट्रेलिया सामना जिंकायचा आहे. फक्त जिंकायचाच नव्हे तर चांगल्या धावा करून आपली बहारदार कामगिरी त्याला दाखवायची आहे. हे सगळं होणार तेव्हा होणार. पण, त्याआधी एक व्हिडीओ समोर आलाय. यात तुम्हाला विराट कोहली आणि हार्दिक-पांड्याचा अलग अंदाज दिसून शकतो. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ पाहा

व्हिडीओ इंस्टावर ट्रेंड

ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी हार्दिक पांड्यानं त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून विराट कोहलीसोबत एक व्हिडिओ शेअर केलाय. यात तो शाकाबूम गाण्यावर नाचताना दिसत आहे. हे गाणे इंस्टाग्रामवर खूप ट्रेंड करत आहे.

गॉगल आणि चप्पल

गॉगल आणि चप्पल घालून दोन्ही खेळाडू सोबत डान्स करताना दिसत आहे. हार्दिकने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘तुम्हाला माहित आहे की आम्ही ते कसे करतो.’ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी खेळाडू स्वत:ला ताजेतवानं करण्यासाठी असं केलं जातंय.

मंगळवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना

मोहालीत टीम इंडिया पोहोचले आहेत. मंगळवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका सुरू होणार आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. सामन्यापूर्वी संघातील खेळाडू मस्तीच्या मूडमध्ये दिसले. हार्दिक पांड्यानं एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो आणि विराट कोहली एकत्र नाचताना दिसत होता. हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.