टीम इंडियाच्या विश्व विजेत्या खेळाडूंमधील 4 मुंबईकरांनी काही वेळेपूर्वी वर्षा या शासकीय निवासस्थानी सत्कार करण्यात आला. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ऑलराउंडर शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या चौघांना गणेशाची मूर्ती आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर आता या चारही मुंबईकर खेळाडूंचं विधानभवनाच जंगी स्वागत करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही सभागृहाच्या सदस्यांच्या उपस्थितीत या चौघांचं जोरात स्वागत करण्यात आलं. त्याआधी वर्षावर मुंबईच्या 4 खेळाडूंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तिथे मुख्यमंत्र्यांनी गणेशाची मूर्ती आणि शाल देऊन सत्कार केला.
खेळाडूंसाठी विधान भवनाच्या प्रांगणात लोककलाकार जमले होते. खेळाडू पोहचताच तुतारी वाजवून त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आलं. त्यानंतर लोककलाकारांनी या खेळाडूंचं औक्षण केलं. त्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये आता या खेळाडूंचा खास सन्मान करण्यात येणार आहे. खेळाडू सेंट्रल हॉलमध्ये पोहचताच महाराष्ट्र गीत लावण्यात आलं. त्यानंतर दिग्गज सुनील गावस्कर यांनी गायलेलं गाणं लावण्यात आलं. दरम्यान विधानभवनात या मुंबईकर खेळाडूंसह कोच पारस महाम्ब्रे आणि स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट असलेले अरुण कानडे हे देखील उपस्थित आहेत.
दरम्यान टीम इंडियाची ही वर्ल्ड कप जिंकण्याची ही चौथी वेळ आहे. टीम इंडियाने 1983 आणि 2011 साली वनडे वर्ल्ड कप जिंकला. तर 2007 नंतर यंदा टीम इंडियाने 2024 साली वर्ल्ड कप जिंकला आहे. मात्र विधानभवनात टीम इंडियाच्या खेळाडूंच्या सत्कार करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकून देणारे खेळाडू : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.