मुंबई : आयपीएलच्या 16 व्या पर्वाला सुरूवात झाली असून थरार आता क्रीडा चाहत्यांना अनुभवता येणार आहे. पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सुरू आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी खूप दिवसांनी मैदानावर दिसला आहे. आजच्या सामन्यामध्ये गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी बोलतावा माहीने आयपीएलमध्ये नव्याने सामील करण्यात आलेल्या इम्पॅक्ट प्लेयरच्या निर्णयावर आपलं मत मांडताना त्यामुळे कोणत्या खेळाडूंचं महत्त्व कमी झालं याबाबत माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाला धोनी?
आम्हाला गोलंदाजीच घ्यायची होती. कारण काल रात्री पाऊस झाल्याने मैदानात दव पडेल की नाही माहिती नाही. तरी आमची पूर्ण तयारी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इम्पॅक्ट प्लेयरची भूमिका महत्त्वाची ठरेल. त्यामुळे निर्णय घेणं सोपं होईल. यामुळे प्लेईंग 11 मधील अष्टपैलू खेळाडूंचा प्रभाव कमी झाला असल्याचं महेंद्र सिंह धोनीने सांगितलं आहे.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), केन विल्यमसन, विजय शंकर, राहुल तेवतिया, आर खान, मोहम्मद शमी, जोशवा लिटल, वाय दयाल आणि अल्जारी जोसेफ.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर