मुंबई : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामधील सामना चालू असताना वाईट बातमी समोर आली आहे. केन विलियमनसन संपूर्ण आयपीएलमधून बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे. नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईच्या संघाचा सलामीवीर ऋुतुराज गायकवाड याने गुजरातच्या बॉलरांचा चांगलाच समाचार घेतला. गायकवाड याने अवघ्या 23 चेंडुत अर्धशतक पूर्ण करत पहिलं अर्धशतक मारत विक्रम केलाय. मात्र ऋुतुराजने मारलेला फटका अडवताना विलियमनसनला फिल्डिंग करताना दुखापत झालीय. ही दुखापत साधी नसून त्याला मैदान सोडावं लागलं आहे.
ऋुतुराज गायकवाड याने सुरूवातीपासूनच आपला दांडपट्टा चालू ठेवला होता. 13 व्या ओव्हरमध्ये जोशवा लिटलच्या गोलंदाजीवर त्याने मोठा फटका खेळला. बॉल सिक्स जाणार असच सर्वांना वाटलं होतं मात्र सीमारेषेवर फिल्डिंग करत असलेल्या केन विलियमनसन याने हेवत उडी घेत चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याला दुखापत झाली. ज्यावेळी तो खाली पडला तेव्हाच त्याने आपला गुडघा पकडला. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला दोन खेळाडूंच्या मदतीने बाहेर यावं लागलं. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ-
GT got 2 runs saved at the cost of Kane potentially getting out of the season. Sometimes fate doesn’t do a fair trade.
Such a tragic end to an exceptionally remarkable effort.#GTvsCSK #KaneWilliamson #IPL2023 #Dhoni #HardikPandya #RuturajGaikwad pic.twitter.com/LqFHivk9lL— Tushar Verma (@Vermaatushar) March 31, 2023
चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट्स गमावत 178 धावा केल्या आहेत. यामध्ये एकट्या ऋुतुराज गायकवाड याने 92 धावांची दमदार खेळी केली. मात्र चेन्नई संघाच्या इतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. डेव्हॉन कॉनवे 1, बेन स्टोक्स 7, अंबाती रायुडू 12, मोईन अली 23, रविंद्र जडेजा 1, शिवम दुबे 19, आणि महेंद्र सिंह धोनीने नाबाद 14 धावा केल्या. गुजरात संघाला सामना जिंकण्यासाठी 179 धावांचं लक्ष्य आहे.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), केन विल्यमसन, विजय शंकर, राहुल तेवतिया, आर खान, मोहम्मद शमी, जोशवा लिटल, वाय दयाल आणि अल्जारी जोसेफ.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर