GT vs CSK : मोहम्मद शमी याने सांगून उडवल्या दांड्या, IPL ची पहिली विकेट एकदम कडक बोल्ड, Video एकदा पाहाच

| Updated on: Mar 31, 2023 | 9:08 PM

गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने धारदार गोलंदाजी करत त्याला बोल्ड केलं. शमीने ही विकेट घेत आपल्या नावावर दोन मोठे विक्रम केले आहेत.

GT vs CSK : मोहम्मद शमी याने सांगून उडवल्या दांड्या, IPL ची पहिली विकेट एकदम कडक बोल्ड, Video एकदा पाहाच
Follow us on

मुंबई : यंदाच्या आयपीएलमधील पहिला सामना गतविजेता संघ गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये सुरू आहे. गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चेन्नईची सुरूवात अत्यंत खराब झाली असून सलामीवीर डेव्हॉन कॉनवे अवघी 1 धाव काढून बाद झाला. गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने धारदार गोलंदाजी करत त्याला बोल्ड केलं. शमीने ही विकेट घेत आपल्या नावावर दोन मोठे विक्रम केले आहेत.

मोहम्मद शमीने याने तिसऱ्या ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर कॉनवेच्या दांड्या उडवल्या. ही विकेट घेत 16 व्या पर्वातील पहिली विकेट घेण्याचा त्याने विक्रम केलाय. इतकंच नाहीतर कॉनवे हा शमीचा 100 बळी ठरलाय. भारताचा आयपीएलमध्ये 100 बळी घेणारा शमी आठवा गोलंदाज ठरला आहे.

पाहा व्हिडीओ-

सीएसकेचा दुसरा सलामीवीर ऋुतुराज गायकवाड याने आपलं आक्रमण चालू ठेवलं आहे. गायकवाडने अर्धशतक पूर्ण केलं असून यंदाच्या मोसमात पहिला अर्धशतक त्याने आपल्या नावावर केलं आहे. 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने त्याने अर्धशतक करत गुजरातच्या गोलंदाजांचा घाम काढलाय.

टॉस हरल्यावर आयपीएलमध्ये नव्याने सामील करण्यात आलेल्या इम्पॅक्ट प्लेयरच्या निर्णयावर आपलं मत मांडताना खेळाडूंचं महत्त्व कमी झाल्याचं महेंद्र सिंह धोनीने म्हटलं आहे. आम्हाला गोलंदाजीच घ्यायची होती. कारण काल रात्री पाऊस झाल्याने मैदानात दव पडेल की नाही माहिती नाही. तरी आमची पूर्ण तयारी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इम्पॅक्ट प्लेयरची भूमिका महत्त्वाची ठरेल. त्यामुळे निर्णय घेणं सोपं होईल. यामुळे प्लेईंग 11 मधील अष्टपैलू खेळाडूंचा प्रभाव कमी झाला असल्याचं महेंद्र सिंह धोनीने सांगितलं आहे.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), केन विल्यमसन, विजय शंकर, राहुल तेवतिया, आर खान, मोहम्मद शमी, जोशवा लिटल, वाय दयाल आणि अल्जारी जोसेफ.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर