अहमदाबाद | कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात जायंट्सवर 3 विके्टसने सनसनाटी विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सने कोलकाताला विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं होतं. कोलकाताने हे आव्हान 7 विकेट्सच्या मोबदल्यात शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं. रिंकू सिंह हा कोलकाताच्या विजयाचा हिरो ठरला. रिंकून शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 5 सिक्स ठोकत कोलकाताला एकहाती मॅच जिंकून दिली.
कोलकाताची सुरुवात अडखळत झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन नितीश राणा आणि वेंकटेश अय्यर या दोघांनी 100 धावांची शतकी भागीदारी केली. कोलकाताने सामन्यातील आव्हान कायम ठेवलं. मात्र नितीश राणा 45 धावांवर आऊट झाला. त्यानंतर वेंकटेश अय्यर याने एकबाजू लावून धरली. वेंकटेश चांगला खेळत होता. पण वेंकटेश यानेही 83 धावांवर आऊट होत मैदानाबाहेरचा रस्ता धरला. यामुळे कोलकाताची 4 बाद 154 अशी स्थिती झाली.
कोलकाताची सामन्यातून पिछेहाट झाली. यानंतर गुजरातचा हंगामी कॅप्टन राशिद खान ओव्हर टाकायला आला. राशिदने तो ज्यासाठी ओळखला जातो, ती कामगिरी त्याने कली. आपल्या फिरकीसमोर त्याने केकेआरच्या 3 धोकादायक फंलदाजांना आऊट करत हॅट्रिक घेतली. राशिदने कोलकाताच्या डावातील 17 व्या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलमध्ये अनुक्रमे आंद्रे रसेल, सुनील नारायण आणि शार्दुल ठाकूर या तिकडीला आऊट करत मोसमातील पहिली हॅटट्रिक घेण्याचा बहुमान मिळवला. त्यामुळे गुजरात जिंकणार हे निश्चित झालं होतं. पण मैदानात रिंकू सिंह नावाचा डेंजर फलंदाज होता.
कोलकाताला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 29 धावांची गरज होती. रिंकू सिंह याच्यासोबत उमेश यादव हे दोघे बॅट्समन मैदानात होते. राशिदने यश दयाल याला ही ओव्हर टाकायला दिली. उमेश यादवने पहिल्या बॉलवर हुशारीने सिंगल काढत रिंकूला स्ट्राईक मिळवून दिली. त्यानंतर जे झालं ते सर्वांनी पाहिलं.
रिंकून पाठी पुढे न पाहता धडाधड बॅट फिरवायला सुरुवात केली. रिंकूने शेवटच्या 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकत अविश्वसनीय कामगिरी केली आणि कोलकाताला जिंकवलं.
कोलकाताला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 29 धावांची गरज होती. रिंकू सिंह याच्यासोबत उमेश यादव हे दोघे बॅट्समन मैदानात होते. राशिदने यश दयाल याला ही ओव्हर टाकायला दिली. उमेश यादवने पहिल्या बॉलवर हुशारीने सिंगल काढत रिंकूला स्ट्राईक मिळवून दिली. त्यानंतर जे झालं ते सर्वांनी पाहिलं. रिंकूनं पाठी पुढे न पाहता धडाधड बॅट फिरवायला सुरुवात केली. रिंकूने शेवटच्या 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकत अविश्वसनीय कामगिरी केली आणि कोलकाताला जिंकवलं.
कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन नितीश राणा आऊट झाला आहे. वेंकटेश अय्यर आणि नितीश राणा या दोघांनी फटकेबाजी करत तिसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी करत कोलकाताला कमबॅक करुन दिलं. मात्र अखेर नितीश 45 धावांवर आऊट झाला.
वेंकटेश अय्यर याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध वेगवान अर्धशतक ठोकलंय. कॅप्टन नितीश राणा आणि वेंकटेश अय्यर या जोडीच्या भागीदारीमुळे कोलकाताने सामन्यात कमबॅक केलंय.
कोलकाता नाईट रायडर्सने दुसरी विकेट गमावली आहे. एन जगदीशन 6 रन्स करुन बाद झाला आहे.
केकेआरने पहिली विकेट गमावली आहे. रहमनुल्लाह गुरुबाज 15 धावा करुन माघारी परतला आहे.
कोलाकाता नाईट रायडर्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. गुजरातने कोलकाताला विजयासाठी 205 रन्सचं टार्गेट दिलं आहे.
साई सुदर्शन याची अर्धशतकी खेळी आणि विजयी शंकर याने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर गुजरात जायंट्सने 200 पार मजल मारली. विजय शंकर याने अखेरच्या काही षटकांमध्ये केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 204 धावा केल्या. गुजरातने यासह कोलकातासमोर 205 धावांचं मजबूत आव्हान दिलं आहे.
विजय शंकर याने सिक्स ठोकत अवघ्या 21 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे. विजय शंकर याचं आयपीएल कारकीर्दीतील हे चौथं अर्धशतक ठरलं.
साई सुदर्शन अर्धशतक ठोकल्यानंतर आऊट झाला आहे. सुदर्शन याने 53 धावांची खेळी केली.
साई सुदर्शन | 4 × 3, 6 × 2, 38 बॉल 53 रन्स.
गुजरात टायटन्स | 153-4, 17.3 ओव्हर
सुयश शर्मा याने गुजरातला तिसरा धक्का दिलाय. सुयशने अभिनव मनोहर याला क्लिन बोल्ड केलंय. अभिनवने 14 धावा केल्या.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्याआधी गुजरात टायटन्सने कॅप्टन बदलला, कारण जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बातमी | GT vs KKR | सामन्याच्या अवघ्या काही मिनिटांआधी कॅप्टन बदलला, नक्की कारण काय?
गुजरातला मोठा झटका बसला आहे. शुबमन गिल याच्या रुपाने गुजरातने दुसरी विकेट गमावली आहे. शुबमनने 31 बॉलमध्ये 39 धावांची खेळी केली.
ऋद्धीमान साहा आऊट झाल्यानंतर शुबमन गिलने साई सुदर्शन याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी रचली आहे. गुजरातने 10 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 88 धावा केल्या आहेत. शुबमन 36 आणि साई सुदर्शन 22 धावांवर खेळत आहेत.
गुजरातला सुनील नारायण याने पहिला झटका दिला आहे. एन जगदीशन याने धावत ऋद्धीमान साहा याचा अफलातून झेल घेतला. साहा याने 17 धावांची खेळी केली.
गुजरात टायटन्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ऋद्धीमान साहा आणि शुबमन गिल ही जोडी मैदानात खेळत आहे. या दोघांनी गुजरातला आश्वासक सुरुवात दिवली आहे. गुजरातने 3 ओव्हरमध्ये बिनबाद 24 धावा केल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, नितीश राणा (क), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.
रशीद खान (कॅप्टन), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि यश दयाल.
गुजरात टायटन्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन राशिद खान याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात हार्दिक पंड्या याची प्रकृती स्थिर नसल्याने राशिद खान याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे राशिद खान कोलकाता विरुद्ध संघाचं नेतृत्व कसं करतो, याकडे टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे.
गुजरातने घरच्या मैदानात टॉस जिंकला
? Toss Update ?@gujarat_titans win the toss and elect to bat first against @KKRiders.
Follow the match ▶️ https://t.co/G8bESXjTyh#TATAIPL | #GTvKKR pic.twitter.com/SmNpbdnacn
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2023