मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. गुजरात आणि मुंबई या स्पर्धेत तिसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. त्यामुळे या स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून आहे. हा सामना गुजरातच्या होमग्राउंडवर होत असून क्रीडाप्रेमींच्या नजरा राशिद खानच्या कामगिरीकडे लागल्या आहेत. या सामन्यातही राशिद खान आणि सूर्यकुमार यादव यांच्यातील द्वंद्व पाहायला मिळणार आहे. दोन्ही खेळाडूंची कामगिरी जबरदस्त आहे. मात्र दोघं एकमेकांसमोर उभे ठाकले की सूर्यकुमार यादव उजवा ठरतो. पण महत्त्वपूर्ण सामन्यात दोन्ही खेळाडू कसर सोडणार नाहीत, हे सुद्धा तितकंच खरं आहे.
आयपीएल 2023 स्पर्धेत राशिद खानने आतापर्यंत 25 गडी बाद केले आहेत. मुंबई विरुद्धच्या दोन सामन्यात एकूण 6 गडी नावावर केले आहे. मात्र इतकं असूनही सूर्यकुमार यादवला बाद करण्यात अपयश आलं आहे. सूर्यकुमारने राशीच्या गोलंदाजीची सर्व अस्त्र परतवून लावली आहेत.
Rohit Sharma ✅
Ishan Kishan ✅@rashidkhan_19 dismissed both #MI openers in the same overFollow the Match: https://t.co/o61rmJWtC5#TATAIPL | #MIvGT | @gujarat_titans pic.twitter.com/iW2PX7Q9fA
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2023
आयपीएल इतिहासात दोन्ही खेळाडूंचा 9 सामन्यात आमनासामना झाला आहे. यात सूर्यकुमार यादवने राशिद खानच्या 47 चेंडूचा सामना केला आहे. यात 142 च्या स्ट्राईकने 67 धावा केल्या आहेत. मागच्या सामन्यात तर सूर्यकुमार यादवने सळो की पळो करून सोडलं होतं. त्यामुळे सूर्याकुमार लगाम घालण्यासाठी राशिदची 4 षटकं महत्त्वाची ठरणार आहेत.
राशिद खानने आयपीएलच्या 10 प्लेऑफ सामन्यात 10 गडी बाद केले आहेत. त्याचा इकोनॉमी रेट फक्त 5.21 आहे. दुसरीकडे सूर्यकुमार यादवचं वानखेडे बाहेरचं प्रदर्शन ठिकठाक आहे. सूर्याने 8 डावात 177 धावा केल्या आहेत. यात फक्त एका अर्धशतकाचा समावेश आहे.
गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.
मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.