गांधीनगर | आयपीएल 16 व्या मोसमात 25 एप्रिल रोजी 35 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी ही रोहित शर्मा याच्याकडे होती. तर हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सची कॅप्टन्सी करत होता. या सामन्यात गुजरातने मुंबई इंडियन्सवर 55 धावांच्या फरकाने विजय मिळवला. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 208 धावांचं मजबूत आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 152 धावाच करता आल्या. चेन्नईचा हा या मोसमातील पाचवा विजय ठरला. तर मुंबई इंडियन्सला 7 पैकी 4 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला 55 धावांनी पराभूत करत मोसमातील पाचवा विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 208 धावांचं मजबूत आव्हान दिलं होतं. मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 152 धावाच करता आल्या. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव ठरला.
मुंबईने आठवी विकेट गमावली आहे. नेहल वढेरा 21 बॉलमध्ये 40 धावा करुन माघारी परतलाय.
मुंबईने सातवी विकेट गमावलीय. पीयूष चावला 18 धावांवर रनआऊट झाला आहे.
मुंबईने सहावी विकेट गमावली आहे. सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे.
मुंबई इंडियन्सने पुन्हा एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावले आहेत. राशिद खान याने सामन्याती 8 व्या ओव्हरमध्ये इशान किशन आणि टिळक वर्मा या दोघांना चालतं केलं. तर त्यानंतर नूर अहमद याने मुंबईच्या डावातील 11 व्या षटकात कॅमरुन ग्रीन आणि टीम डेव्हिड या दोघांचा काटा काढला.
राशिद खान याने मुंबईला सामन्यातील आठव्या ओव्हरमध्ये 2 धक्के दिले. राशिदने आधी इशान किशन आणि त्यानंतर टिळक वर्मा या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
मुंबईला दुसरा झटका लागला आहे. राशिद खान याने इशान किशन याला आऊट केलंय. इशानने 21 बॉलमध्ये 13 धावा केल्या.
मुंबई इंडियन्सची खराब सुरुवात झाली आहे. गुजरातचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला 2 धावांवर आऊट केलं.
गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 208 धावांचं मजबूत आव्हान दिलं आहे. गुजरातने 6 विकेट्स गमावून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 207 धावा केल्या. गुजरातकडून शुबमन गिल याने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. गिल याने 7 चौकार आणि 1 सिक्स ठोकला. मिलरने अखेरच्या काही चेंडूंपर्यंत जोरदार फटकेबाजी करत 22 बॉलमध्ये 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या. अभिनव मनोहर यानेही टॉप गिअर टाकत 21 बॉलमध्ये 42 रन्सची इनिंग केली. तर अखेरच्या काही बॉलमध्ये राहुल तेवितिया याने 5 बॉलमध्ये 3 सिक्ससह नाबाद 20 धावा केल्या. तर विजय शंकर याने 19, कॅप्टन हार्दिक पंड्या याने 13, ऋद्धीमान साहा याने 4 आणि राशिद खाने याने 2* धावा केल्या. मुंबईकडून पियूष चावला याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर कुमार कार्तिकेय, अर्जुन तेंडुलकर, बेहरनडॉर्फ आणि रिले मेरेडिथ या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
अभिनव मनोहर आऊट झाला आहे. अभिनव मनोहर याने 21 बॉलमध्ये 42 धावांनी निर्णायक खेळी केली.
अभिनव मनोहर आणि डेव्हिड मिलर या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे.
गुजरातने चौथा विकेट गमावली आहे. विजय शंकर 19 धावा करुन तंबूत परतला आहे.
ऋद्धीमान साहा, हार्दिक पंड्या यांच्यानंतर शुबमन गिल हा आऊट झाला आहे. शुबमनने 56 धावा केल्या.
गुजरात टायटन्सने मोठी विकेट गमावली आहे. गुजरातचा कॅप्टन हार्दिक पंड्या 13 धावा करुन आऊट झाला.
गुजरात टायटन्स टीमने पहिली विकेट गमावली आहे. ऋद्धीमान साहा 4 धावा करुन करुन बाद झाला आहे.
गुजरात टायटन्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ऋद्धीमान साहा आणि शुबमन गिल सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. अर्जुन तेंडुलकर मुंबईकडून पहिली ओव्हर टाकत आहे.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, के कार्तिकेय सिंग, एन वडेरा, रायली मेरेडिथ, पीयूष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि जेसन बेहरेनडॉर्फ.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी आणि नदीम अहमद.
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुजरात मुंबईसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
गुजरात टायटन्स टीमने आयपीएलमध्ये गेल्या वर्षी 15 व्या सिजनमधून पदार्पण केलं होतं. गुजरातचं यंदाचं दुसरंच वर्ष आहे. गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यात एकूण 1 वेळाच आमनासामना झाला आहे. मुंबईने या एकमेव सामन्यात गुजरातवर विजय मिळवला होता.
आयपीएल 16 व्या हंगामात आज गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध 5 वेळ ट्रॉफीविजेता मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत.