मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामधील सामन्यात गुजरातने 62 धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. गुजरातने 233 धावांचं भलं मोठं आव्हान मुंबईसमोर ठेवलं होतं. मुंबईची बॅटींग पाहता त्यांनी साखळी सामन्यांमधे चारवेळा 200 पेक्षा जास्त धावांचं आव्हान पार केलं होतं. मात्र आज काही त्यांची बॅटींग झाली नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टार प्लेअर सूर्यकुमार यादव आज परत एकदा सुपला शॉट खेळताना आऊट झाला.
सूर्याने आणि ग्रीन यांनी एक चांगली भागीदारा केली होती. सूर्यकुमार मैदानात होता तेव्हा सामन्यावर मुंबईची पकड असल्यासारखं वाटत होतं. 38 चेंडूत सूर्याने 61 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले मात्र सुपला शॉट मारण्याच्या नादात तो बोल्ड आऊट झाला. सूर्याची सुपला शॉट मारण्याची ताकद आहे मात्र हीच ताकद त्याची आता कमजोरी होताना दिसत आहे.
…अन् इथे मुंबकडून टाटा बाय बाय…#GujaratTitans #MumbaiIndians #MohitSharma #IPL2023 #Qualifier2 #GTvsMI #IPLPlayOffs #म @gujarat_titans@mipaltan@IPL pic.twitter.com/rnZqF79DZg
— Harish Malusare (@harish_malusare) May 26, 2023
गुजरातने 20 षटकात 3 गडी गमवून 233 धावा केल्या आणि विजयासाठी 234 धावांचं आव्हान दिलं. पण मुंबईचा संघ 171 धावा करू शकला. शुबमन गिलचं शतक आणि मोहित शर्माच्या पाच विकेट्सने मुंबई सामन्यात बॅकफूटला गेली आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि आकाश मढवाल.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.