अहमदाबाद | गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आयपीएल 2023 क्वालिफायर 2 मध्ये आमनेसामने आहेत. ही मॅच जिंकणारी टीम अंतिम सामन्यात पोहचेल. विजयी टीमचा सामना अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होईल. तर पराभूत होणाऱ्या संघाचा प्रवास हा इथेच संपेल. या क्वालिफायर 2 मॅचचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. अहमदाबादमध्ये आणि स्टेडियमच्या आसपास परिसरात पाऊस झाला. त्यामुळे टॉसला विलंब झाला. परिणामी सामना 8 वाजता सुरु करण्याचा निर्णय झाला.
मुंबई इंडियन्सने या निर्णायक सामन्यात टॉस जिंकला आहे. मुंबई कॅप्टन रोहित शर्मा याने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. गुजरात विरुद्धच्या या मॅचसाठी रोहितने टीम प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल केला आहे. मुंबईत एकमेव झालेला बदल नक्की काय आहे, हे जाणून घेऊयात.
रोहितने या सामन्यासाठी टीममध्ये स्पिनच्या जागी लेफ्ट आर्म स्पिनला प्राधान्य देण्याचा निर्णय केला आहे. या सामन्यासाठी ऋतिक शौकीन याच्या जागी कुमार कार्तिकेय याला संधी देण्यात आली आहे. खेळपट्टीचा अंदाज घेत रोहितने ही खेळी केली आहे. आता रोहितचा हा निर्णय किती योग्य ठरतो,याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मुंबईच्या पलटणमध्ये एकमेव बदल
Rohit: "Shokeen misses out, Kartikeya comes in."#OneFamily #GTvMI #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL
— Mumbai Indians (@mipaltan) May 26, 2023
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये एकूण 3 वेळा भिडले आहेत. त्यापैकी 16 व्या मोसमातील साखळी फेरीत एकूण 2 वेळा आमनेसामने हे दोन्ही संघ आले आहेत. मुंबईने या 3 पैकी 2 मॅचमध्ये गुजरातचा सुपडा साफ केलाय. तर गुजरातनेही एकदा विजय मिळवलाय. मात्र ही आकडेवारी झाली साखळी फेरीतील. तर आता ही क्वालिफायर 2 म्हणजे सेमी फायनल मॅच आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी दोन्ही संघ जीव तोडून प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे फक्त आकड्यानुसार कोणत्याही टीमला गृहीत धरुन चालणार नाही.
मुंबईची प्लेइंग इलेव्हन
Here's your BIG GAME XI! ?
Paltan, aaj full power support chahiye. ??#OneFamily #GTvMI #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 @Dream11 pic.twitter.com/EB0Une8rN7
— Mumbai Indians (@mipaltan) May 26, 2023
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि आकाश मढवाल.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.