गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं आहे. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 168 धावा केल्या. मुंबईच्या गोलंदाजांनी गुजरातला सुरुवातीपासूनच आपल्या धारदार बॉलिंगमध्ये बांधून ठेवलं. त्यामुळे काही अपवाद वगळता गुजरातच्या फलंदाजांना बेछूट फटकेबाजी करता आला नाही. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांना गुजरातला 170 आधी रोखण्यात यश आलं. आता पलटणला 17 व्या हंगामात पहिल्या विजयसाठी 169 धावा कराव्या लागणार आहेत.
गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शन याने 39 बॉलमध्ये 3 चौकार आणि 1 सिक्ससह 45 धावांची खेळी केली. कॅप्टन शुबमन गिल याने 22 बॉलमध्ये 21 रन्स केल्या. ऋद्धीमान साह याने 19 धावा जोडल्या. अझमतुल्लाह ओमरझई आणि डेव्हीड मिलर या दोघांनी अनुक्रमे 17 आणि 12 धावा केल्या. तर अखेरीस राहुल तेवतिया याने फटकेबाजी करुन मुंबईवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र गेराल्ड कोएत्झी याने त्याला गुंडाळलं. तेवतियाने 15 बॉलमध्ये 22 धावा केल्या. तर विजय शंकर आणि राशिद खान हे दोघे नाबाद 6 आणि 4 धावा करुन नाबाद राहिले.
जसप्रीत बुमराहने खऱ्याने अर्थाने गुजरातला दबाव तयार केला. तर दुसऱ्या बाजूने गेराल्ड कोएत्झी याने त्याला चांगली साथ दिली. तसेच अनुभवी पीयूष चावला याने शुबमन गिल याची मोठी विकेट घेतली. मुंबईकडून यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. गेराल्ड कोएत्झी याने 2 विकेट्स घेतल्या. तर पियूष चावला याला 1 विकेट मिळाली.
मुंबई गुजरातला रोखण्यात यशस्वी
Wickets at regular intervals, another magical Boom spell.. 💙
..𝘼𝙉𝘿 𝙏𝙃𝙀 𝘾𝙃𝘼𝙎𝙀 𝙄𝙎 𝙊𝙉 💪🏃#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #GTvMI pic.twitter.com/PfPnIfRq9y
— Mumbai Indians (@mipaltan) March 24, 2024
गुजरात टायटन्स प्लेईंग इलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (डब्ल्यू), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर आणि स्पेन्सर जॉन्सन.
मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.