अहमदाबाद | गुजरात टायटन्स टीमचा युवा ओपनर बॅट्समन शुबमन गिल याने क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना झोडपून काढलं. शुबमनने मुंबई विरुद्ध 129 धावांची शतकी खेळी केली. शुबमनच्या या शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने 20 ओव्हरमध्ये 233 धावा केल्या. आयपीएल प्लेऑफ इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या टीमने 200 प्लस धावा केल्या. त्यामुळे मुंबईला विजयासाठी 11 पेक्षा अधिक रन रेटने धावांची गरज आहे. मुंबईने या हंगामात एकूण 4 वेळा 200 प्लस धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. मुंबईची बॅटिंग लाईनअप तगडी आहे. त्यामुळे या सामन्यात रंगत पाहायला मिळणार आहे.
गुजरातकडून शुबमनने अवघ्या 60 बॉलमध्ये सर्वाधिक 129 धावांची खेळी केली. या खेळीत शुबमनने 10 कडक सिक्स आणि 7 चौकार ठोकले. शुबमनचं आयपीएल 16 व्या मोसमातील तिसरं शतक ठरलं. शुबमनने या खेळीत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. शुबमनने मुंबईच्या एकाही गोलंदाजाला सोडलं नाही. शुबमनने प्रत्येक बॉलरचा टप्प्यात कार्यक्रम केला.
शुबमनचं आणखी एक खणखणीत शतक
????????! ??
Stand and applaud the Shubman Gill SHOW ??#TATAIPL | #Qualifier2 | #GTvMI | @ShubmanGill pic.twitter.com/ADHi0e6Ur1
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
शुबमन व्यतिरिक्त गुजरातकडून ऋद्धीमान साहा याने 18 धावा केल्या. साई सुदर्श 43 धावांवर दुखापत झाल्याने मैदानातून बाहेर पडला. तर हार्दिक पंड्या याने नाबाद 28 धावा केल्या. तर राशिद खान 5 धावा करुन नाबाद परतला. मुंबईकडून आकाश मढवाल आणि पियूष चावला या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि आकाश मढवाल.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.