आयपीएलच्या 17 व्या मोसमातील पाचव्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत विजयी सुरुवात केली आहे. तर मुंबई 2012 नंतर यंदाही आपला पहिला सामना जिंकण्यात अपयशी ठरली. गुजरातने मुंबईला विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना मुंबईला विजयासाठी 20 व्या ओव्हरमध्ये 19 धावांची गरज होती. मात्र उमेश यादवने 12 धावा देत हार्दिक पंड्या आणि पीयूष चावला या दोघांना आऊट करत गुजराचा विजय पक्का केला. गुजरातच्या या विजयासह शुबमन गिल याने कॅप्टन्सीचीही विजयी सुरुवात केलीय. तसेच मुंबईची मोसमातील आपला पहिला सामना जिंकण्याची प्रतिक्षा आणखी एका वर्षांनी वाढली आहे.
गुजरात टायटन्सने शुबमन गिल याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 17 व्या मोसमात विजयी सुरुवात केली आहे. गुजरातने मुंबईवर 6 धावांनी विजय मिळवला. गुजरातने मुंबईला विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 162 धावाच करता आल्या. मुंबई यासह 2012 नंतर आयपीएलमधील आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यात अपयशी ठरली.
मुंबईला 6 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. कॅप्टन हार्दिक पंड्या आणि शम्स मुलानी खेळत आहेत. सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.
मुंबईने पाचवी विकेट गमावली आहे. मोहित शर्मा याने आपल्या बॉलिंगवर धोकादायक टीम डेव्हिड याला आऊट केलंय. डेव्हिड मिलर याने टीमचा कडक कॅच घेतला.
मुंबई इंडियन्सला विजयासाठी 3 ओव्हरमध्ये 36 धावांची गरज आहे. मुंबईने 169 धावांचा पाठलाग करताना 17 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 133 धावा केल्या आहेत.
मुंबईला निर्णायक क्षणी मोठा झटका लागला आहे. रोहित शर्मा याच्यानंतर डेवाल्ड ब्रेव्हिस आऊट झाला. डेवाल्डने 46 धावांची खेळी केली. डेवाल्डच्या या खेळीत 3 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता.
साई सुदर्शन याने गुजरात टायटन्सला मोठी विकेट मिळवून दिली आहे. साईने मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का देत रोहित शर्मा याला आऊट केलं. साईने यासह रोहित-डेवाल्ड ब्रेव्हिस (इमपॅक्ट) ही जोडी फोडून काढली. रोहित-डेवाल्ड या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 169 धावांचा पाठलाग करताना 77 धावांची भागीदारी केली. तर रोहित शर्मा याने 29 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 सिक्ससह 43 धावांची खेळी केली.
मुंबईने झटपट 2 विकेट्स गमावल्यानंतर जोरदार कमबॅक केलं आहे. डेवाल्ड ब्रेव्हिस आणि रोहित शर्मा या दोघांनी 70 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करत मुंबईला 100 पार पोहचवलं आहे.
मुंबईने दुसरी विकेट गमावली आहे. नमन धीर 10 बॉलमध्ये 20 धावा करुन तंबूत परतला. अझमतुल्लाह याने नमनला एलबीडल्यू आऊट केलं.
मुंबई इंडियन्ससाठी 17 व्या हंगामात बॅटिंगने निराशाजनक सुरुवात झाली आहे. गुजरातने विजयासाठी दिलेल्या 169 धावांचा पाठलाग करताना ओपनर ईशान किशन मुंबईची शून्य धावसंख्या असताना कॅच आऊट झाला.
मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे, गुजरातने मुंबईला विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलंय. मुंबईकडून या विजयी आव्हानाच्या पाठलागासाठी ईशान किशन आणि रोहित शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
गुजरातने मुंबईसमोर विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं आहे. गुजरातने 6 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 168 धावा केल्या. गुजरातकडून साई सुदर्शन याने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराह याने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
जसप्रीत बुमराह याने सामन्यातील 17 व्या ओव्हरमध्ये गुजरातला 2 झटके दिले आहेत. बुमराहने आधी पहिल्या बॉलवर डेव्हिड मिलर याला 12 धावांवर कॅप्टन हार्दिक पंड्या याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर साई सुदर्शन या सेट फलंदाजाला तिलक वर्मा याच्या हाती 45 धावांवर झेलबाद केलं.
गुजरात टायटन्सने चौथी विकेट गमावली आहे. विस्फोटक बॅट्समन डेव्हिड मिलर 12 धावा करुन आऊट झाला. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने मिलरचा कॅच घेतला.
मुंबईने गुजरातला तिसरा धक्का दिला आहे. गेराल्ड कोएत्झी याने पहिली विकेट घेतलीय. गेराल्डने अझमतुल्लाह उमरझई याला आऊट केलंय. अझमतुल्लाह याने 17 धावा केल्या.
मुंबई इंडियन्सचा अनुभवी बॉलर पीयूष चावला याने गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुबमन गिल याला रोहित शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. शुबमनने 22 बॉलमध्ये 31 धावांची खेळी केली.
जसप्रीत बुमराह याने 17 व्या हंगामात मुंबईसाठी पहिली विकेट घेतली. जसप्रीत बुमराहने गुजरात टायटन्सच्या ऋ्द्धीमान साहा याला आऊट केलं. साहाने 15 बॉलमध्ये 19 धावांची खेळी केली.
गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईने टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. कॅप्टन शुबमन गिल आणि ऋद्धीमान साहा ही सलामी जोडी गुजरातकडून बॅटिंगसाठी आली आहे.
मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.
गुजरात टायटन्स प्लेईंग इलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (डब्ल्यू), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर आणि स्पेन्सर जॉन्सन.
मुंबई इंडियन्सने 17 व्या मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून गुजरात टायटन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. सूर्यकुमार यादव अनफिट असल्याने त्याचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नाही. तर दुखापतीनंतर जसप्रीत बुमराह याचं 1 वर्षानंतर आयपीएलमध्ये कमबॅक झालंय. आता मुंबई गुजरातला किती धावांवर रोखते, याकडे लक्ष असणार आहे.
आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि गुजरात दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध 4 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये दोन्हा संघांमध्ये बरोबरीची लढाई राहिली आहे. मुंबई आणि गुजरात दोघांनी प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत.
गुजरात टायन्स आणि मुंबई इंडियन्स 17 व्या हंगामात आपला पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांनी आपल्या सलामीच्या सामन्याआधी जोरदार सरावा केला आहे. हा सामना दोन्ही संघ आपल्या नव्या कर्णधारांच्या नेतृत्वात खेळणार आहेत. हार्दिक पंड्या मुंबईचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर शुबमन गिल याच्या खांद्यावर गुजरातची जबाबदारी आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.