GT vs PBKS : 4 सिक्स आणि 3 फोर, कर्णधार श्रेयस अय्यरची कडक सुरुवात, गुजरातविरुद्ध खणखणीत अर्धशतक

| Updated on: Mar 25, 2025 | 9:08 PM

Shreyas Iyer Fifty : श्रेयस अय्यर याने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंजाबसाठी कर्णधार म्हणून पदार्पणातील सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध अर्धशतक झळकावलं.

GT vs PBKS : 4 सिक्स आणि 3 फोर, कर्णधार श्रेयस अय्यरची कडक सुरुवात, गुजरातविरुद्ध खणखणीत अर्धशतक
Shreyas Iyer Fifty GT vs PBKS Ipl 2025
Image Credit source: @PunjabKingsIPL X Account
Follow us on

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) पंजाब किंग्सचा (PBKS) कर्णधार म्हणून पदार्पण करताना अप्रतिम सुरुवात केली आहे. श्रेयसने पंजाबच्या या मोहिमेतील पहिल्या आणि 18 व्या हंगामातील पाचव्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अर्धशतक झळकावलं आहे. श्रेयसने 14 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर सिक्स झळकावून अर्धशतक पूर्ण केलं. श्रेयसचं हे आयपीएलमधील एकूण 22 वं तर पंजाबचा कर्णधार म्हणून पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं आहे.

श्रेयसचं अर्धशतक

गुजरातचा राशीद खान पंजाबच्या डावातील 14 वी ओव्हर टाकायला आला. राशीदने सलग पहिले 2 बॉल डॉट टाकले. श्रेयसने तिसऱ्या बॉलवर सिंगल घेत मार्कस स्टोयनिसला स्ट्राईक दिली. त्यानंतर मार्कसने चौथ्या बॉलवर एकेरी धाव घेतली. त्यामुळे पुन्हा श्रेयस स्ट्राईकवर आला. श्रेयस 45 धावांवर नाबाद होता. श्रेयसने राशीदला पाचव्या बॉलवर खणखणीत षटकार ठोकला आणि अर्धशतक पूर्ण केलं. श्रेयसने फक्त 27 चेंडूत हे अर्धशतक पूर्ण केलं. श्रेयसने 188.89 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक केलं. तसेच श्रेयसने या अर्धशतकी खेळीत 36 धावा या चौकार आणि षटकारद्वारे केल्या. श्रेयसने 4 षटकार आणि 3 चौकार लगावले.

चॅम्पियन कॅप्टन

दरम्यान श्रेयस अय्यर चॅम्पियन कॅप्टन आहे. श्रेयसने गेल्या हंगामात आपल्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली होती. त्यानंतर केकेआरने श्रेयसला रिलीज केलं. त्यानंतर पंजाबने श्रेयसला 26 कोटी 75 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं.

कॅप्टन श्रेयसची गुजरातविरुद्ध फिफ्टी

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), साई सुदर्शन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, आर साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.

पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.