आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) पाचव्या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) आमनेसामने होते. दोन्ही संघांचा हा या हंगामातील पहिला सामना होता. पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सवर मात करत या हंगामात विजयी सलामी दिली. पंजाबने गुजरातला विजयासाठी 244 रन्सचं टार्गेट दिलं होतं. गुजरातने या धावांचा पाठलाग करताना चिवट प्रतिकार केला आणि सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगतदार स्थितीत कायम ठेवला. मात्र गुजरातला शेवटच्या ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 232 धावांपर्यंतच पोहचता आलं. शुबमन गिलच्या नेतृत्वात गुजरातच्या मोहिमेची सुरुवात पराभवाने झाली. तर श्रेयस अय्यर याच्या कॅप्टन्सीत पंजाबने विजयी सुरुवात केली.
आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्सने विजयी सलामी दिली आहे. पंजाब किंग्सने 20 षटकात 5 गडी गमवून 243 धावा केल्या आणि विजयासाठी 244 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरात टायटन्सने या धावांचा पाठलाग करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण 234 धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाब किंग्सने हा सामना 11 धावांनी जिंकला.
गुजरातने तिसरी विकेट गमावली आहे. जोस बटलर निर्णायक क्षणी आऊट झाला आहे. मार्को यान्सेन याने बटलरला बोल्ड केलं. बटलरने 33 बॉलमध्ये 54 रन्स केल्या.
गुजरातने दुसरी आणि मोठी विकेट गमावली आहे. अर्शदीप सिंह याने निर्णायक क्षणी पंजाबला विकेट मिळवून दिली आहे. अर्शदीपने सेट साई सुदर्शन याला शशांक सिंह याला 74 धावावंर आऊट केलं. साईने या खेळीत 6 सिक्स 5 फोर ठोकले.
गुजरातने पहिली विकेट गमावली आहे. ग्लेन मॅक्सवेल याने शुबमनला प्रियांश आर्य याच्या हाती 33 धावांवर कॅच आऊट केलं.
गुजरातच्या सलामी जोडीने 244 धावांचा पाठलाग करताना अप्रतिम सुुरुवात केली आहे. कॅप्टन शुबमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीने 5 ओव्हरमध्ये 51 रन्स जोडल्या आहेत.
गुजरातच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार शुबमन गिल-साई सुदर्शन सलामी जोडी मैदानात आली आहे. पंजाबने गुजरातसमोर 244 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
पंजाब किंग्सने गुजरात टायटन्ससमोर 244 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 243 धावा केल्या.
गुजरातने पंजाबला पाचवा झटका दिला आहे. साई सुदर्शन याने मार्कस स्टोयनिसला आऊट करत वैयक्तिक तिसरी विकेट मिळवली. स्टोयनिसने 20 धावा केल्या.
पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर गुजरातविरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे. श्रेयसने या खेळीसह पंजाबचा डाव सावरला आहे.
साई सुदर्शन याने पंजाबला सलग 2 झटके दिले आहेत. साईने अजमतुल्लाह ओमरझई याच्यानंतर ग्लेन मॅक्सवेल याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
राशिद खान याने प्रियांश आर्या याला आऊट करत पंजाबला दुसरा झटका दिला आहे. राशिदने प्रियांशला 47 रन्सवर आऊट केलं.
कगिसो रबाडा याने पंजाब किंग्सला पहिला झटका दिला आहे. कगिसो रबाडा याने प्रभसिमरन सिंह याला 5 धावांवर आऊट केलं आहे.
गुजरात विरुद्ध पंजाब सामन्याला सुरुवात झाली आहे. गुजरातने पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. पंजाबकडून प्रियांश आर्या-प्रभसिमरन सिंह सलामी जोडी मैदानात आली आहे.
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), साई सुधारसन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, आर साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.
गुजरातने टॉस जिंकला आहे. कर्णधार शुबमन गिल याने पंजाबविरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुजरात विरुद्ध पंजाब यांच्यातील सामन्यात टीम इंडियाच्या 2 खेळाडूंकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे. शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या 2 कर्णधारांच्या कामगिरीकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे.
गुजरात टायटन्स टीम: जोस बटलर (विकेटकीपर), शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, इशांत शर्मा, जयंत यादव, महिपाल लोमरोर, करीम जनात, कुलवंत खेजरोलिया, अनुज रावत, जेराल्ड कोएत्झी, शेरफेन रदरफोर्ड, मानव सुथार, कुमार कुशाग्रा, अर्शद खान, गुरनूर ब्रार आणि निशांत सिंधू.
पंजाब किंग्स टीम : जोश इंग्लिस (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, विजयकुमार वैशाख, प्रवीण दुबे, लॉकी फर्ग्युसन, झेवियर बार्टलेट, विष्णू विनोद, यश ठाकूर, आरोन हार्डी, अजमतुल्ला ओमरझाई, कुलदीप सेन, प्रियांश आर्य, सूर्यांश शेडगे, हरनूर सिंग, मुशीर खान आणि पायला अविनाश.
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील पाचव्या सामन्यात गुजरात विरुद्ध पंजाब आमनेसामने आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.