मुंबई : वुमन्स प्रीमिअर लीगमधील गुजरात जायन्ट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सहावा सामन्यात सुरू होता. या सामन्यात गुजरात जायन्ट्स संघाने 11 धावांनी विजय मिळवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे. गुजरात संघाने आपला पहिल विजय मिळवत विजयाचा श्रीगणेशा केलाय. गुजरात जायन्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 201 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. बंगळुरु संघाला 20 षटकात 190 धावाच करता आल्या.
गुजरातकडून सब्भिनेनी मेघना आणि सोफिया डंकले ही जोडी मैदानात सलामीला उतरली. या जोडीने पहिल्या षटकापासून आक्रमक खेळीला सुरुवात केली. मात्र मेघना तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाली. तिने 11 चेंडूत 8 धावांची खेळी केली. आठ धावा तिने दोन चौकारांच्या मदतीने केल्या.
एक विकेट पडल्यानंतर डंकलेला साथ लाभली ती हर्लीन देओल हीची. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 60 धावांची खेळी केली. सोफिया डंकलेनं आक्रमक खेळी करत 28 चेंडूत 65 धावा ठोकल्या. या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. त्यानंतर हर्लीननं आपला आक्रमक अंदाज सुरुच ठेवला. हर्लीनने 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 45 चेंडूत 67 धावा केल्या.
तिसऱ्या गड्यासाठी हर्लीन देओल आणि एशले गार्डनरनं 53 धावांची भागीदारी केली. त्यानंतर एशले गार्डनर 15 चेंडूत 19 धावा करून बाद झाली. दयालन हेमलथानं हर्लीनला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण 7 चेंडूत 16 धावा करून तंबूत परतली. तिने 2 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्यानंतर अन्नाबेल सुथरलँड 14 धावा करून बाद झाली. तरीही हर्लीननं आपली एकाकी लढत सुरुच ठेवली होती. त्यानंतर स्नेह राणा 2 धावा करून धावचीत झाली.हर्लीन शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्रिफळाचीत होऊन तंबूत परतली.
आरसीबीकडून स्मृती मंधाना 18 धावा, एलिसे पेरी 32 धावा, रिचा घोष 10 धावा, कानिका अहुजा 10 धावा यांना मोठी खेळता करता आली नाही. सोफि डेविने सर्वाधिक 66 धावा केल्या तर हिथर नाईट अखेरपर्यंत 30 करून नाबाद राहिली. 11 चेंडूत तिने 5 चौकार आणि 1 षटकार मारत संघाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या मात्र समोरून तिला साथ न मिळाल्याने 11 धावांनी आरसीबीचा पराभव झाला.
दोन्ही संघांची प्लेईंग 11
गुजरात जायन्ट्स संघ | सब्भिनेनी मेघना, सोफिया डंकले, हर्लीन देओल, एशले गार्डनर, अन्नाबेल सुथरलँड, सुष्मा वर्मा, दयालन हेमलथा, स्नेह राणा (कर्णधार), तनुजा कनवार, किम गार्थ, मानसी जोशी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | स्मृती मंधाना (कर्णधार), सोफि डेवि, एलिसे पेरी, हिथर नाईट, रिचा घोष, पूनम खेमनर, कानिका अहुजा, श्रेयंका पाटील, मेगन स्कट, रेणुका सिंह, प्रीती बोस