मुंबई : दरवर्षी आयपीएलमध्ये अनेक सुंदर चेहरे कॅमेऱ्यात कैद होताना दिसतात. हे चेहरे कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर ते प्रसिद्धीझोतात येतातच. असाच एक चेहरा सध्या चांगलाच लोकप्रिय झाला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पंड्याचा संघ गुजरात टायटन्स दमदार कामगिरी करताना दिसत आहे. गुजरात टायटन्सची टीम जशी फॉर्ममध्ये आहे तशीच गुजरातची मिस्ट्री गर्ल तन्वी शाह देखील चांगलीच चर्चेत आहे. याच मिस्ट्री गर्ल्सबद्दल आज आम्ही खास गोष्टी सांगणार आहोत.
एका सामन्यात राजस्थान रॉयल्स या संघाने गुजरातचा 3 विकेट्सने पराभव केला होता. पण या सामन्यादरम्यान मिस्ट्री गर्ल म्हणून लोकप्रिय झालेल्या तन्वीच्या चेहऱ्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. विशेष म्हणजे तन्वी ग्लॅमरस असण्यासोबतच फिटनेस फ्रिक देखील आहे. ती एक टेनिसपटू असून या खेळातून ती स्वतःला नेहमी फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तर आज आम्ही तुम्हाला तन्वीची काही फिटनेस सिक्रेट्स सांगणार आहोत. तर जाणून घेऊया तिच्या या सिक्रेट्सचे शरीराला होणारे फायदे..
तन्वी शाह तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेताना दिसते. तन्वीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वर्कआउट रूटीन फॉलो करताना दिसत आहे. यात तन्वी स्किपिंग करताना दिसत आहे. स्किपिंग केल्याने वजन तर कमी होतेच पण शरीराचे अवयवही तंदुरुस्त राहतात. स्किपिंग करायला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते.
तन्वीने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती स्वत:ला व्यायाम किंवा वर्कआउटसाठी प्रेरित करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तन्वी व्यायाम करताना दिसत आहे. तसंच तिनं पोस्टच्या कॅप्शनमध्ये, शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे किती महत्त्वाचे आहे हे देखील सांगितले आहे. या पोस्टमधून तन्वी तिच्या फिटनेसबद्दल किती सिरीयस आहे हे दिसून येत आहे.
जगभरातील लोक योगा करण्यावर मोठ्या प्रमाणात भर देतात. यामध्ये तन्वी ही त्यापैकी एक आहे. तन्वीने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये ती तिच्या मैत्रिणीसोबत योगा करताना दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिले की, आम्ही आमच्या आठवड्याची सुरुवात अशा प्रकारे करतो.
तर तन्वीप्रमाणे तुम्हीही व्यायाम किंवा योगा करून स्वतःला फिट आणि हेल्दी ठेवू शकता. कारण दररोज व्यायाम केल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांपासून लांब राहू शकता. त्यामुळे तुम्हीही दररोज 30 मिनिटे व्यायाम किंवा योगा करा जेणेकरून तुम्ही फ्रेश आणि हेल्थी राहाल.