मुंबई : आयपीएल 2024 सीझन सुरू होण्याआधीच मोठा उलटफेर झालेला पाहायला मिळाला आहे. गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्त्वा केलेल्या हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्स संघाने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मुंबईने हार्दिकला आपल्या संघात घेण्यासाठी 15 कोटी रूपये मोजले आहेत. संघाचा कर्णधारच ट्रेडिंगमध्ये गेल्याने गुजरात संघाने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे.
Shubman Gill announced as the captain of Gujarat Titans….!!!! pic.twitter.com/eZFgHQEkmK
— Johns. (@CricCrazyJohns) November 27, 2023
मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पंड्या गेल्याने गुजरात संघाने आपला नवीन कर्णधार म्हणून शुबमन गिल याची नियुक्ती केली आहे. शुबमन गिल याने गुजरातसाठी दमदार कमगिरी केली असून यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने सर्वाधिक धावा ऑरेंज कॅप जिंकली होती. शुबमन याने 17 सामन्यांमध्ये 890 धावा केल्या होत्या.
2018 साली शुबमनने केकेआर संघाकडून पदार्पण केलं होतं. आतापर्यंत 91 सामन्यांमध्ये त्याने 2790 धावा केल्या असून यामध्ये 3 शतके 18 अर्धशतके केली आहेत. मात्र कोलकाता संघाने शुबमन गिलला रिलीज केलं होतं. त्यानंतर गुजरातने त्याला लिलावाआधी 8 कोटी रूपयांमध्ये खरेदी केलं होतं.
वर्ल्ड कपमध्ये इतकी काही खास कामगिरी केली नसली तरी शुबमन एक क्लास खेळाडू आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक त्यासोबतच वनडे मध्ये पठ्ठ्याने द्विशतक केलं आहे. न्यूझीलंडसारख्या तगड्या संघाविरूद्ध त्याने 208 धावा केल्या होत्या.
शुबमन गिल तरूण असून त्याच्याकडे संघाचं कर्णधारपद गेल्याने सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. कारण संघात अनेक सीनिअर खेळाडू आहेत. केन विलियमसन याच्याकडे कॅप्टनसी जाईल असं सर्वांना वाटलं होतं पण टीम मॅनेजमेंटने भविष्याचा विचार करत गिलकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.