Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Match: आय़पीएल 2022 चा किताब कोण जिंकणार, याची प्रतिक्षा आज संपली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज हा फायनलचा सामना खेळला गेला. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये सामना होता. गुजरात टायटन्सने आयपीएमध्ये पहिलं विजेतेपद मिळवलं आहे. राजस्थानने विजयासाठी दिलेलं 131 धावांच लक्ष्य गुजरातने आरामात पार केलं. इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेला 6 वर्षानंतर नवीन चॅम्पियन मिळाला आहे. गुजरात टायटन्सने सात विकेट राखून विजय मिळवला. गुजरात टायटन्सचा हा पहिलाच सीजन होता, तर राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या पहिल्याच मोसमाचं विजेतेपद मिळवलं होतं. गुजरातने क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात राजस्थानला नमवून फायनलमध्ये प्रवेश केला होता. राजस्थान रॉयल्सने क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यात RCB ला हरवून 14 वर्षांनी फायनलमध्ये प्रवेश केला होता.
गुजरात टायटन्स Playing 11: हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋदिमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, डेविड मिलर, राहुल तेवतिया, आर साई किशोर, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन , मोहम्मद शामी, यश दयाल,
राजस्थान रॉयल्स Playing 11: संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर. यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ओबेड मेकॉय, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा,
दुसऱ्या आयपीएलचे जेतेपद मिळवण्यात राजस्थानचा संघ अपयशी ठरला.
इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेला 6 वर्षानंतर नवीन चॅम्पियन मिळाला आहे.
गुजरात टायटन्सने आयपीएमध्ये पहिलं विजेतेपद मिळवलं आहे. गुजरातने याच सीजनमध्ये आयपीएलमध्ये डेब्यू केला होता. या संघाने कमालाची कामगिरी केली आहे. IPL 2022 मध्ये पहिल्या सामन्यापासून या संघाने दमदार कामगिरी केली होती. पॉइंट्स टेबलमध्येही हा संघ पहिल्या स्थानावर होता. गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर सात विकेट राखून विजय मिळवला. राजस्थानने विजयासाठी दिलेलं 131 धावांच लक्ष्य गुजरातने आरामात पार केलं.
AAPDE GT GAYA!
WE ARE THE #IPL Champions 2⃣0⃣2⃣2⃣!#SeasonOfFirsts | #AavaDe | #GTvRR | #IPLFinal pic.twitter.com/VqwWJqq6Nt
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 29, 2022
16 ओव्हर्समध्ये गुजरात टायटन्सच्या तीन बाद 109 धावा झाल्या आहेत. 24 चेंडूत विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. डेविड मिलर 17 आणि शुभमन गिल 37 धावांवर खेळतोय.
राजस्थान रॉयल्सला गुजरातची मोठी विकेट मिळाली आहे. युजवेंद्र चहलने एका अप्रतिम चेंडूवर कॅप्टन हार्दिक पंड्याला स्लीपमध्ये यशस्वी जैस्वालकरवी झेलबाद केलं. पंड्याने 30 चेंडूत 34 धावा केल्या. यात 3 चौकार आणि 1 षटकार मारला. गुजरातची तीन बाद 86 अशी स्थिती आहे.
12 ओव्हर्समध्ये गुजरात टायटन्सच्या दोन बाद 77 धावा झाल्या आहेत. अश्विनच्या गोलंदाजीवर कॅप्टन हार्दिक पंड्याने हल्लाबोल केला. 15 धावा लुटल्या. हार्दिक 28, शुभमन गिल 29 धावांवर खेळतोय.
9 ओव्हर्समध्ये गुजराच्या दोन बाद 48 धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्याने प्रसिद्ध कृष्णाच्या या ओव्हरमध्ये दोन चौकार मारले.
गुजरात टायटन्सच्या 8 षटकात दोन बाद 38 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 14 आणि हार्दिक पंड्या 4 धावांवर खेळतोय.
Video: BOSS #AkshayKumar sir waiving at fans during #IPL2022 final today. pic.twitter.com/R7MNK1bTba
— Akshay Kumar 24×7 (@Akkistaan) May 29, 2022
पावरप्लेमध्ये गुजरात टायटन्सने 6 षटकात दोन बाद 31 धावा केल्या आहेत. हार्दिक पंड्या आणि शुभमन गिलची जोडी मैदानात आहे.
गुजरात टायटन्सला दुसरा झटका बसला. मॅथ्यू वेड 8 धावांवर आऊट झाला. बोल्टने रियान परागकरवी त्याला झेलबाद केलं. गुजरातच्या 4.4 षटकात दोन बाद 23 धावा झाल्या आहेत.
गुजरातला पहिला झटका बसला आहे. दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने वृद्धीमान साहाला क्लीन बोल्ड केलं. साहाने 5 धावा केल्या. गुजरातच्या एक बाद 11 धावा झाल्या आहेत.
आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 130 धावा केल्या आहेत. हार्दिक पंड्याने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने संजू सॅमसन, जोस बटलर आणि शिमरॉन हेटमायर हे महत्त्वाचे विकेट काढले. राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक 39 धावा केल्या.
The @gujarat_titans captain @hardikpandya7 led from the front, scalping 3⃣ wickets, & was our top performer from the first innings of the #TATAIPL 2022 Final. ? ? #GTvRR
A summary of his performance ? pic.twitter.com/tAgwUmp72s
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
राजस्थानची सातवी विकेट गेली आहे. ट्रेंट बोल्ट 11 धावांवर बाद झाला. साई किशोरने तेवतियाकरवी झेलबाद केलं. 17.3 षटकात राजस्थानच्या 7 बाद 112 धावा झाल्या आहेत.
राजस्थान रॉयल्सची सहावी विकेट गेली आहे. रविचंद्रन अश्विन 6 धावांवर बाद झाला. साई किशोरने मिलरकरवी झेलबाद केलं. 16 ओव्हर्समध्ये सहा बाद 98 अशी राजस्थानची स्थिती आहे.
Final. WICKET! 15.5: Ravichandran Ashwin 6(9) ct David Miller b Sai Kishore, Rajasthan Royals 98/6 https://t.co/8QjB0b5n7z #Final #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
राजस्थानच्या 15 षटकात पाच बाद 94 धावा झाल्या आहेत. पॉवर हिटर शिमरॉन हेटमायरला हार्दिक पंड्याने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं. हेटयमारने 11 धावा केल्या.
Final. WICKET! 14.6: Shimron Hetmyer 11(12) ct & b Hardik Pandya, Rajasthan Royals 94/5 https://t.co/8QjB0b5n7z #Final #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. स्टेडियम परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जोस बटलरच्या रुपाने गुजरात टायटन्सला मोठी विकेट मिळाली आहे. हार्दिक पंड्याने हे यश मिळवून दिलं. त्याने विकेटकीपर साहाकरवी झेलबाद केलं. बटलर 39 धावांवर आऊट झाला. राजस्थानची 79/4 अशी स्थिती आहे.
Final. WICKET! 12.1: Jos Buttler 39(35) ct Wriddhiman Saha b Hardik Pandya, Rajasthan Royals 79/4 https://t.co/8QjB0b5n7z #Final #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
राशिद खानने राजस्थानला तिसरा झटका दिला आहे. देवदत्त पडिक्कलला अवघ्या 2 धावांवर मोहम्मद शामीकरवी झेलबाद केलं. राजस्थानची स्थिती 79/3
Final. WICKET! 11.5: Devdutt Padikkal 2(10) ct Mohammad Shami b Rashid Khan, Rajasthan Royals 79/3 https://t.co/8QjB0b5n7z #Final #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
आजच्या सामन्यात जोस बटलरने एक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला. त्याने सर्वाधिक धावा बनवण्याच्या बाबतीत डेविड वॉर्नरला मागे टाकलं. वॉर्नरने 2016 मध्ये 848 धावा केल्या होत्या. बटलर आता पुढे निघून गेला आहे, तो आता दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीच्या नावावर एका सीजनमध्ये 973 धावा आहेत.
11 षटकात राजस्थान रॉयल्सच्या दोन बाद 75 धावा झाल्या आहेत.
10.2 षटकात राजस्थानच्या दोन बाद 73 धावा झाल्या आहेत. बटलर 37 धावांवर खेळतोय. देवदत्त पडिक्कल त्याला साथ देतोय.
राजस्थान रॉयल्सला दुसरा झटका बसला आहे. कॅप्टन संजू सॅमसन 14 धावांवर OUT झाला आहे. हार्दिक पंड्याने साई किशोरकरवी झेलबाद केलं
Final. WICKET! 8.2: Sanju Samson 14(11) ct Sai Kishore b Hardik Pandya, Rajasthan Royals 60/2 https://t.co/8QjB0b5n7z #Final #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
8 ओव्हर्समध्ये राजस्थानच्या एक बाद 59 धावा झाल्या आहेत. जोस बटलर आणि संजू सॅमसनची जोडी जमली आहे. दोघांमध्ये 28 धावांची भागीदारी झाली आहे. राशिद खानने आठवी ओव्हर टाकली. बटलर 22 आणि सॅमसन 14 धावांवर खेळतोय.
आयपीएल फायनल पहायला अक्षय कुमार उपस्थित आहे. त्याच्याशेजारी रणवीर सिंह बसला आहे. पावरप्लेच्या सहा षटकात राजस्थानच्या एक बाद 44 धावा झाल्या आहेत.
पाच ओव्हर्समध्ये राजस्थानच्या एक बाद 37 धावा झाल्या आहेत. बटलर 9 आणि संजू सॅमसन पाच धावांवर खेळतोय.
चार ओव्हर्समध्ये राजस्थानच्या एकबाद 31 धावा झाल्या आहेत. यशस्वी जैस्वालच्या रुपाने पहिला विकेट गेला. यश दयालने त्याला साई किशोरकरवी झेलबाद केले. यशस्वीने 22 धावा केल्या. यात दोन षटकार आणि एक चौकार लगावला.
मोहम्मद शमीने तिसरं षटक टाकलं. यशस्वी जैस्वालने या ओव्हरमध्ये एका चौकार आणि एक षटकार मारला. राजस्थानच्या बिनबाद 21 धावा झाल्या आहेत.
यश दयालने दुसरं षटक टाकलं. जोस बलटरने तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. राजस्थानच्या बिनबाद 7 धावा झाल्या आहे.
IPL 2022 फायनलला सुरुवात झाली आहे. मोहम्मद शमीने पहिलं षटक टाकलं. जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल ही राजस्थानची सलामीची जोडी मैदानात आहे. राजस्थानच्या बिनबाद 2 धावा झाल्या आहेत.
हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋदिमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, डेविड मिलर, राहुल तेवतिया, आर साई किशोर, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन , मोहम्मद शामी, यश दयाल,
अल्जारी जोसेफच्या जागी आज अनुभवी लॉकी फर्ग्युसनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
राजस्थान रॉयल्स Playing 11: संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर. यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ओबेड मेकॉय, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा,
राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनने फायनलचा टॉस जिंकला. त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळपट्टीपाहून फलंदाजी स्वीकारल्याचं संजूने सांगितलं. संघात कोणताही बदल केला नसल्याचं त्याने सांगितलं.
Final. Rajasthan Royals won the toss and elected to bat. https://t.co/8QjB0b5UX7 #Final #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
Jai Ho! ? ?@arrahman & Co. are joined by @RanveerOfficial on stage! ? ?#TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/GkOKOIiggG
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
Vande Mataram ?? @arrahman‘s magical performance will touch your hearts. #TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/ixvjn9vlRT
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
आयपीएलने सर्वात मोठ्या क्रिकेट जर्सीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. क्लोजिंग सेरेमनीच्या आधी ही जर्सी सादर करण्यात आली. जर्सीवर सर्व 10 संघांचे लोगो आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि आयपीएल अध्यक्ष बृजेश पटेल यांनी गिनीज रेकॉर्ड स्वीकारला.
A ???????? ????? ?????? to start #TATAIPL 2022 Final Proceedings. ? #GTvRR
Presenting the ?????’? ??????? ??????? ?????? At The ?????’? ??????? ??????? ??????? – the Narendra Modi Stadium. @GCAMotera ? pic.twitter.com/yPd0FgK4gN
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
Ranveer Singh’s energy just unbelievable in the IPL Closing ceremony. pic.twitter.com/68mib4B1Xc
— CricketMAN2 (@ImTanujSingh) May 29, 2022
A Special Tribute! ? ?@IPL salutes and celebrates 7⃣5⃣ Years of Indian Cricket. ? ?#TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/pbBVUUqyn0
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
रणवीर सिंहचा तुफानी परफॉर्मन्स संपला असून आता प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक AR रेहमान यांच्या परफॉर्मन्सला सुरुवात झाली आहे.
रणवीर सिंह म्हणजे एनर्जी. आयपीएलच्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये रणवीर सिंह तसाच परफॉर्मन्स सादर करत आहे. बॉलिवूडच्या वेगवेगळ्या गाण्यांवर त्याने ठेका धरला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम प्रेक्षकांनी खच्चून भरलं आहे. प्रेक्षक या परफॉर्मन्सचा मनापासून आनंद लुटत आहेत.
क्लोजिंग सेरेमनीमध्ये रणवीर सिंहच्या परफॉर्मन्सला सुरुवात झाली. 83 चित्रपटातील गाण्यावर नृत्य सुरु आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियम प्रेक्षकांनी खच्चून भरलेलं आहे. जगातलं हे सर्वात मोठं स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये प्रेक्षकांची आसनव्यवस्था 1.32 लाख आहे. क्लोजिंग सेरेमनीला सुरुवात झाली आहे.
आयपीएल मध्ये 2018 नंतर पहिल्यांदा क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्यात आली आहे. 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद झाल्याने ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी झाली नव्हती. 2020 आणि 2021 मध्ये कोरोनामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नव्हता.
It all boils down to this in our #SeasonOfFirsts ?
Just a few hours away from playing at home, and here’s what the Titans feel about this massive occasion! ?@atherenergy #AavaDe #IPLFinal pic.twitter.com/2ThJe7Jx0Z
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 29, 2022
राजस्थानला अंतिम सामन्यात बटलरकडून भरपूर अपेक्षा आहेत. बटलरची नजर आज विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडण्यावर असेल. बटलरने क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यात आरसीबी विरुद्ध चौथं शतक झळकावलं होतं.
Capacity Crowd ?
…. Just bring it! ✊?⚡️⚡️⚡️
Tune in to watch me live performing at the Closing ceremony of Tata IPL Final 2022 on Star Sports & Disney+Hotstar today at 6.25 pm.#TATAIPL #TATAIPLFINAL @IPL pic.twitter.com/CX3nxXHk3f
— Ranveer Singh (@RanveerOfficial) May 29, 2022
IPL 2022 चा फायनल सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये होणार आहे. सामन्याआधी राजस्थान रॉयल्स 2008 च्या चॅम्पियन संघातील सदस्यांना सन्मानित करेल.
IPL मध्ये विजेत्या संघाला 20 कोटी रुपये तर पराभूत संघाला 13 कोटी रुपये मिळतील. आरसीबीला 7 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सच्या खात्यात 6.50 कोटी रुपये जमा होतील.
Gujarat vs Rajasthan LIVE Updates: राजस्थान Playing XI च्या 7 खेळाडूंवर हा ‘गुजराती’ एकटा भारी पडू शकतो, रेकॉर्डचं आहे तसा
Excitement level ?
Stoked to be performing with @arrahman sir and gang for the IPL closing ceremony in Ahemdabad #IPLFinal #IPL2022 #GTvsRR pic.twitter.com/DohfFp3wLv— Neeti Mohan (@neetimohan18) May 28, 2022
गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा सामना पाहण्यासाठी एक लाखाहून अधिक प्रेक्षक पोहोचण्याची अपेक्षा आहे. हा सामना पाहण्यासाठी एक लाख 10 हजाराहून अधिक प्रेक्षक पोहोचले तर हा एक विश्वविक्रम ठरेल. दरम्यान, गुजरात फायनलमध्ये गेली म्हणून मोदीही मॅच बघायला येणार, अशीही चर्चा संध्या रंगली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील सामना पाहण्यासाठी येण्याची शक्यता आहे. गुजरात फायनलला गेली म्हणून पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री फायनल पाहण्यासाठी जाणार असल्याची वेगळीच चर्चा देखील रंगली आहे.
केरळच्या विविध भागात मान्सूनचं आगमन, हवामान विभागाची माहिती
मान्सूनची आनंदाची बातमी
केरळात मान्सूनचं झालं आगमन
मान्सून लवकरच सक्रीय होणार
5 ते 6 तारखेला दक्षिण गोव्यात मान्सून दाखल होणार
तर संपूर्ण महाराष्ट्रात 14 ते 15 तारखेला दाखल होण्याची शक्यता
हवामान विभागाची माहिती
आयपीएलचा पहिला सीझन 2008 मध्ये खेळला गेला त्यादरम्यान शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले. त्यावेळी आरआरला 4.8 कोटी रुपये मिळाले होते. ही लीग जसजशी जगभर लोकप्रिय होत गेली तसतशी बक्षिसांची रक्कमही वाढत गेली. आजघडीला जेतेपद पटकावणाऱ्या संघाला 20 कोटी रुपयांचे बक्षीस मिळते.
शहिद सुभेदार विजय शिंदे यांचे पार्थिव काही वेळात विसापुर गावात पोहचेल
प्रथम कुटुंबियांच्या दर्शनासाठी घरी आणणार
नंतर गावातुन अंत्ययात्रा निघेल
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा ओबेड मेकॉय,
गुजरात टायटन्स – हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋदिमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, आर साई किशोर, अल्जारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मद शमी
14 long years later… ?
Coming for you. ? pic.twitter.com/s6HgwzIEjO
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 28, 2022