GT vs RR, IPL 2022, qualifier-1: आयपीएल 2022 ची लीग स्टेज संपली असून आजपासून प्लेऑफचे सामने सुरु होत आहेत. महाराष्ट्रात लीग स्टेजचा टप्पा पूर्ण झाला आहे. आजपासून कोलकात्याच्या प्रसिद्ध इडन गार्डन्स स्टेडियमवर सामने सुरु होतील. क्वालिफायर 1 चा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्समध्ये होणार आहे. गुजरातचा हा पहिलाच सीजन असून पहिल्याच सीजनमध्ये या संघाने कमाल केली आहे. पॉइंट्स टेबलमध्ये गुजरातची टीम पहिल्या तर राजस्थानचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आज या दोन टीम्समधून एक संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. हरणाऱ्या संघाला फायनलमध्ये जाण्यासाठी आणखी एक संधी मिळेल.
डेव्हिड मिलरकडून राजस्थानची धुलाई
महात्वाच्या सामन्यात मिलरची चांगली बॅटिंग
चहलच्या बॉलिंगवर जोरदार प्रहार
सामना अजूनही अटीतटीचा
तीन ओव्हरमध्ये 34 धावांची गरज
विजयासाठी गुजरातला 43 धावांची गरज
हार्दिक आणि मिलरची सेट जोडी मैदानावर
दोघे शेवटपर्यंत टिकल्यास राजस्थानचा मार्ग खडतर
5 ओव्हरमध्ये गुजरातला विजयासाठी 50 धावांची गरज
चहलनच्या बॉलिंगवर समोर षटकार
6 ओव्हरमध्ये गुजरातला विजयासाठी 60 धावांची गरज
फुल टॉस बॉलवर जोरदार फटका
गुजरातच्या 115 धावा पूर्ण
चौकार मारून संपवली ओव्हार
सेट फलंदाज मॅथ्यू वेड तंबूत परतला
हार्दिक पांड्याने मारला शानदार चौकार
पुन्हा शानदार चौकारने ओव्हरचा शेवट
शुभमन गिल रन आऊट
आतापर्यंत वेडचे 5 शानदार चौकार
दिल्या फक्त दोन धावा
लखनऊची गाडी रुळावर
प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्या ओव्हारमध्ये एकूण 14 धावा झाल्या. शुभमन गिलने दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर वेडने चौकार मारला. गुजरातने 2 षटकांत 1 विकेट गमावून 18 धावा केल्या आहेत.
पहिल्या ओव्हारमध्ये विकेट हाती लागली
181 धावा पूर्ण
सिक्स मारून ओव्हरचा केला शेवट
हेटमायरची विकेट मिळाली
फिरकीपटू राशिद खानने आपल्या कोट्यातील 4 षटकात केवळ 15 धावा दिल्या. त्याने डावाच्या 16व्या षटकात एकूण 3 धावा दिल्या. राजस्थानने 16 षटकांत 3 गडी गमावून 127 धावा केल्या.
आणखी दोन शानदार चौकार
17 व्या ओव्हरची सुरूवात चौकाराने
एकाच ओव्हारमध्ये मारले 4 चौकार
बटलरने धुलाई सुरू केली
हार्दिक पांड्याकडून पडिकलच्या धावांच्य गाडीला ब्रेक
28 धावा करुन पडिकल परतला
पडिकलने एक सिक्स, दोन चौकार ठोकले
पडिकलने गिअर बदलला
पडिकल हात खोलले
स्कोरबोर्ड वेगाने पुढे सरकतोय
गंगनचुंंबी सिक्सने राजस्थानचे टेन्शन वाढवलं
सजू सॅमसनचा डाव समाप्त
स्पिनरने विकेट काढली
गुजरात टायटन्सचा फिरकीपटू आणि उपकर्णधार राशिद खानने त्याच्या पहिल्या षटकात फक्त 6 धावा दिल्या. संजू सॅमसनने शेवटच्या चेंडूवर एकच धाव घेतली, ज्यामुळे तो आणि जोस बटलर यांच्यातील अर्धशतक भागीदारीही पूर्ण झाली. राजस्थानने 7 षटकांत 1 गडी गमावून 61 धावा केल्या.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या 5व्या षटकात संजू सॅमसनने शेवटच्या दोन चेंडूंवर सलग चौकार मारले. यानंतर, अल्झारी जोसेफच्या पहिल्या षटकाचा दुसरा चेंडू मिड-विकेटवर आणि लाँग ऑनवर षटकार खेचला. त्याने चौथ्या चेंडूवर 56 मीटर लांब षटकारही मारला. या षटकात 13 धावा झाल्या. राजस्थानने 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये 1 विकेट गमावून 55 धावा केल्या आहेत.
यश दयालच्या दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनने शानदार षटकार ठोकून आपले खाते उघडले. हा डावातील पहिला षटकार आहे. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने चौकारही मारला. या षटकात एकूण 10 धावा झाल्या. राजस्थानने 4 षटकात 1 गडी गमावून 28 धावा केल्या आहेत. जोस बटलर 14 तर कर्णधार संजू सॅमसन 10 धावा करून क्रीजवर आहे.
राजस्थानची दणक्यात सुरूवात
संजू सॅमसन जबरदस्त फॉर्ममध्ये