मोहाली | पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात गुजरातने टॉस जिंकून पंजाब किंग्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पंजाब विरुद्धच्या सामन्यातून मोहित शर्मा याने गुजरात टायटन्ससाठी पदार्पण केलं आहे. तसेच हार्दिक पंड्याची तब्येत स्थित सुधारल्याने त्याचंही कमबॅक झालं आहे. हार्दिकने यासह पुन्हा एकदा कर्णधारपदाची सूत्र आपल्या हाती घेतली. मात्र दुसऱ्या बाजूला टीम मॅनेजमेंटने एका खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिलेली नाही. त्यामुळे टीम मॅनेजमेंटवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाराजीचं कारणही तसंच आहे. चांगली फलंदाजी करुनही संघातून बाहेर केल्याने चाहते आक्रमक झाले आहेत.
गुजरात टायटन्सने विजय शंकर याला पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यातून प्लेइंग इलेव्हनमधून वगळलं आहे. विजय शंकर याने गेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध तुफानी खेळी केली होती. विजय शंकर याने कोलकाता विरुद्ध 24 बॉलमध्ये 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 24 बॉलमध्ये नाबाद 63 धावांची खेळी केली होती. विशेष म्हणजे विजयने 21 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.
विजय शंकर याला केकेआर विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली होती. हार्दिक पंड्या याची केकेआर विरुद्धच्या सामन्याआधी प्रकृती बिघडली होती. त्यामुळे तो खेळण्यास असमर्थ होता. यामुळे विजय शंकर याला संधी मिळाली होती. विजयने या संधीचा फायदा घेत अर्धशतकी खेळीही केली होती.
आता पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यातून हार्दिक पंड्या याची एन्ट्री झाली. त्यामुळे हार्दिकचं कमबॅक झाल्याने विजय शंकर याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावं लागंलय.
दरम्यान मोहित शर्मा याने गुजरात टायटन्ससाठी पदार्पण केलं आहे. मोहित शर्मा अनुभवी गोलंदाज आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना पर्पल कॅपही जिंकली आहे. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात येते. मोहित गेल्या 2 वर्षांपासून आयपीएलपासून दूर होता. मोहित या सामन्याआधी आपला अखेरचा समना हा पंजाब किंग्स विरुद्ध 20 सप्टेंबर 2020 रोजी दुबई क्रिकेट स्टेडियम इथे खेळला होता.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, ऋषी धवन आणि अर्शदीप सिंग.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुधारसन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि जोशुआ लिटल.