Asia Cup 2023 : आशिया कपआधी तमिम इक्बालनंतर आणखी एका कर्णधाराची निवृत्ती

| Updated on: Aug 06, 2023 | 12:15 PM

Retirement : आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. मात्र त्याआधी कर्णधारानेच असा निर्णय घेतल्याने संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. कर्णधाराने थेट निवृत्तीची घोषणा केल्याने क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा होताना दिसत आहे.

Asia Cup 2023 : आशिया कपआधी तमिम इक्बालनंतर आणखी एका कर्णधाराची निवृत्ती
Follow us on

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर आशिया कप 2023 आला असताना  बांगलादेश संघाचा कर्णधार तमिन इक्बालने कर्णधारपदावरून पायउतार घेण्याचा निर्णय घेतला होता. निवृत्ती घेतल्यावर राष्ट्रपतींनी तमिम इक्बाल याला निवृत्ती मागे घ्यायला लावली होती. अशातच आणखी एका कर्णधाराने थेट निवृत्तीची घोषणा केली आहे. आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. मात्र त्याआधी कर्णधारानेच असा निर्णय घेतल्याने संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.

कोण आहे तो खेळाडू?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून नेपाळ संघाचा कर्णधार ज्ञानेंद्र मल्ला याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये ज्ञानेंद्र मल्ला याने 37 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7 अर्धशतके केली असून 876 धावा केल्या आहेत. 45 टी-20 सामन्यांमध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकासह 883 धावा केल्यात. क्रिकेटमधूव निवृत्ती घेणार असल्याची पोस्ट त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे.

मला वाटत आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे. देशांतर्गत क्रिकेट ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट खेळताना मला खूप काही शिकायला मिळालं असल्याचं, ज्ञानेद्र मल्ला याने म्हटलं आहे.

 

नेपाळ संघाच्या कर्णधारपदावर त्याची निवड झाल्यावर ज्ञानेंद्र मल्ला याने 10 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. यामधील 6 सामन्यांमध्ये त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने विजय मिळवला आहे. तर टी-20 सामन्यांमध्ये 12 पैकी 9 सामने नेपाळने जिंकले आहेत. ज्ञानेंद्रच्या नावावर एका खास विक्रम असून त्याने पदार्पण सामन्यात हा विक्रम आपल्या नावावर केला होता. 2018 मध्ये एकदिवसीय सामन्यामध्ये अर्धशतक झळकवणारा तो पहिला खेळाडू ठरला.