आयपीएलमध्ये कोणीच घेतलं नाही, हनुमा विहारीसह 7 भारतीय खेळाडूंनी धरली बांगलादेशची वाट

| Updated on: Mar 15, 2022 | 3:40 PM

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या महा लिलावात (Mega Auction) अनेक भारतीय खेळाडूंना लॉटरी लागली आहे. त्याच वेळी, जे खेळाडू विकले गेले नाहीत त्यापैकी काही जण बांगलादेशात गेले आहेत. हनुमा विहारीसह (Hanuma Vihari) 7 भारतीय खेळाडूंनी बांगलादेशची वाट धरली आहे.

आयपीएलमध्ये कोणीच घेतलं नाही, हनुमा विहारीसह 7 भारतीय खेळाडूंनी धरली बांगलादेशची वाट
Hanuma Vihari
Image Credit source: BCCI
Follow us on

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या महा लिलावात (Mega Auction) अनेक भारतीय खेळाडूंना लॉटरी लागली आहे. त्याच वेळी, जे खेळाडू विकले गेले नाहीत त्यापैकी काही जण बांगलादेशात गेले आहेत. हनुमा विहारीसह (Hanuma Vihari) 7 भारतीय खेळाडूंनी बांगलादेशची वाट धरली आहे. विहारीशिवाय अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran), परवेज रसूल, बाबा अपराजित, अशोक मनेरिया, चिराग जानी आणि गुरिंदर सिंग अशी या खेळाडूंची नावे आहेत. हे भारतीय खेळाडू बांगलादेशला जाऊन ढाका प्रीमियर लीग (DPL) या स्पर्धेत खेळणार आहेत. हे ते खेळाडू आहेत जे फेब्रुवारीमध्ये झालेल्या IPL 2022 च्या लिलावात विकले गेले नव्हते.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत हनुमा विहारी टीम इंडियाचा भाग होता. ढाक्याला रवाना होण्यापूर्वी तो सर्वप्रथम हैदराबाद येथील त्याच्या घरी जाणार आहे. हनुमा ढाका प्रीमियर लीगमध्ये अबाहानी लिमिटेडकडून खेळताना दिसणार आहे, ज्यामध्ये तो या आठवड्याच्या शेवटी सामील होण्याची शक्यता आहे. हंगामातील पहिल्या 3 सामन्यात हनुमा या संघाकडून खेळताना दिसणार नाही. त्याच्या जागी अफगाणिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज नजीबुल्ला झाद्रानला त्या सामन्यांमध्ये स्थान देण्यात आली आहे.

या संघांकडून खेळणार 7 भारतीय खेळाडू

हनुमा विहारी व्यतिरिक्त, टीम इंडियाच्या कसोटी संघासाठी निवडलेला अभिमन्यू ईश्वरनदेखील ढाका प्रीमियर लीगकडे वळला आहे. तेथे तो प्राइम बँकेकडून खेळताना दिसणार आहे. याशिवाय शेख जमाल धानमोंडीकडून परवेज रसूल, रूपगंज टायगरकडून बाबा अपराजित, खेलाघरकडून अशोक मनेरिया, लिजेंड ऑफ रुपगंजकडून चिराग जानी आणि गाझी ग्रुप क्रिकेटर्समधून गुरिंदर हे खेळाडू खेळताना दिसणार आहे.

विहारी, ईश्वरन, अपराजित, मनेरिया आणि रसूल हे यापूर्वी ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळले आहेत. कोरोनाच्या आधीच्या मोसमात ते तिथे खेळायचे. याशिवाय दिनेश कार्तिक, मनोज तिवारी आणि युसूफ पठाण हे खेळाडूही ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळले आहेत.

इतर बातम्या

श्रीलंकेवरील मोठ्या विजयामुळे WTC Points Table मध्ये टीम इंडियाला मोठा फायदा

IND vs SL: ‘श्रेयसला माहितीय तो अजिंक्यच्या….’, रोहित शर्मा अय्यरबद्दल बोलला खास गोष्ट

दोन दिवसात ठरणार, हार्दिक पंड्या IPL 2022 मध्ये खेळणार की, नाही, परीक्षा द्यावीच लागेल