Video : हरभजन सिंगला मॉलमध्ये जाणं पडलं महागात, पत्नी गीता बसराने ते प्रकरण पकडलं आणि दिला धक्का

| Updated on: Dec 12, 2023 | 10:05 PM

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याचं प्रकरण पत्नीनं रंगेहाथ पडकलं आणि रागाच्या भरात त्याला धक्का दिला. यावेळी स्पष्टीकरण देताना हरभजन सिंग याची बोबडी वळाली . नेमकं काय आहे प्रकरण आणि झालं ते जाणून घ्या.

Video : हरभजन सिंगला मॉलमध्ये जाणं पडलं महागात, पत्नी गीता बसराने ते प्रकरण पकडलं आणि दिला धक्का
Video : हरभजन सिंगच्या पत्नीनं अखेर गुपित पकडलं! रागाच्या भरात पहिल्यांदा सुनावलं आणि नंतर दिला धक्का
Follow us on

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याच्या गोलंदाजीची जादू अजूनही कायम आहे.हरभजन सिंगने २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्यानंतर आयपीएल खेळताना दिसला आणि नंतर समालोचकाच्या भूमिकेत आला लीजेंड्स लीग स्पर्धेत याची झलक पाहायला मिळाली. मनीपाल टायगर्सकडून हरभजन सिंग मैदानात उतरला होता. या संघाने जेतेपद जिंकल्यानंतर हरभजन सिंग घरी परतला आहे. पण घरी आल्यानंतर त्याचं प्रकरण पत्नीनं पकडलं आणि त्याला चांगलाच मार पडला. गीता बसरा हरभजन सिंगचं वागणं अजिबात आवडलं नाही. हरभजन सिंगने पत्नी गीता बसरासह हा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओखाली मित्र आणि क्रिकेटपटूंनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. राहुल शर्माने हसणारा, तर सुरेश रैनाने दिल असलेला इमोजी कमेंट केला आहे.

हरभजन सिंग व्हिडीओत कोणाशी बोलताना दिसत आहे. “मी मॉलमध्ये गेलो होतो. काय जबरदस्त वातावरण होतं. इतक्या साऱ्या भाभी होत्या, त्या पण एकापेक्षा एक सरस. तू खरंच मिस केलं. मॉलमध्ये भाभीशिवाय काहीच पसंत आलं नाही.”, असं संभाषण सुरु होतं. तितक्यात मागे पत्नी गीता बसरा आली. त्याचं सर्वकाही ऐकून घेतलं. मग त्याच्या समोर येताच हरभजनची बोबडी वळाली.

“मला तुझ्या भाभीशिवाय कोणीच पसंत नाही.”, अशी सारवासारव फोनवर करू लागला. पण तिथपर्यंत गीता नाराज झाली होती. तिने हरभजन सिंगला जोरदार धक्का दिला आणि तेथून निघून गेली. हा व्हिडीओ पोस्ट करताना हरभजन सिंगने लिहिलं आहे की, मॉलमध्ये जाणं महागात पडलं. खरं तर हा एक मजेशीर व्हिडीओ आहे. मुळात हे काही खरं नसून मनोरंजन हाच हेतू आहे.

हरभजन सिंगच्या चाहत्यांनाही हा व्हिडीओ आवडला. हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा बॉलिवूड अभिनेत्री होती. गीता आणि हरभजन सिंग यांनी एकमेकांना समजून घेतल्यानंतर लग्नाचा निर्णय घेताल. दोघांनी २०१५ मध्ये लग्न केलं.