Natasa Stankovic : कौटुंबिक वादावर अखेर हार्दिकने मौन सोडलं, रिकी पॉटिंगने विचारलेल्या प्रश्नावर थेट उत्तर देत म्हणाला..

| Updated on: Jun 13, 2024 | 7:39 PM

हार्दिक पांड्याला मागच्या काही महिन्यात बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागलं. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील दुखापतीपासून ते कौटुंबिक वादाच्या रंगलेल्या चर्चा..यामुळे हार्दिक पांड्याच्या आयुष्यात बरीच उलथापालथ झाल्याची चर्चा रंगली आहे. असं असताना वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान रिकी पाँटिंगने बरोबर कोंडीत पकडला आणि हार्दिक पांड्याने एका वाक्यात सर्वकाही सांगून टाकलं.

Natasa Stankovic : कौटुंबिक वादावर अखेर हार्दिकने मौन सोडलं, रिकी पॉटिंगने विचारलेल्या प्रश्नावर थेट उत्तर देत म्हणाला..
Image Credit source: video grab
Follow us on

टीम इंडियाची टी20 वर्ल्डकप स्पर्धेत आगेकूच सुरु आहे. टीम इंडियाने सुपर 8 फेरीत जागा मिळवली आहे. तसेच अष्टपैलू हार्दिक पांड्यालाही सूर गवसल्याचं दिसत आहे. गोलंदाजीत हार्दिक पांड्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पण फलंदाजीत हवी तशी संधी त्याला मिळाली नाही. त्यामुळे पुढच्या काही सामन्यात संधी मिळाली तर नक्कीच त्याचं सोनं करेल यात शंका नाही. एकंदरीत हार्दिक पांड्या स्पर्धेत स्थिर स्थावर होत असल्याचं दिसत आहे. या स्पर्धेपूर्वी हार्दिक पांड्या अनेक संकटांना सामोरं गेला. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मध्येच झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने संघात घेतलं आणि कर्णधारपद सोपवलं. त्यामुळे त्याला डिवचण्याची एकही संधी मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माच्या चाहत्यांनी सोडली नाही. भर मैदानात हार्दिक पांड्याला या स्थितीला सामोरं जावं लागलं. आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरीही निराशाजनक राहिली. ते होत नाही ते हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांच्यात दूरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आलं. पण 15 दिवसांपूर्वी नताशाने इंस्टाग्रामवर फोटो स्टोअर केले आणि वादावर पडदा पडला. यानंतर हार्दिक पांड्याने पहिल्यांदाच वैयक्तिक आयुष्याबाबत जाहीर वक्तव्य केलं आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान आणि भारत यांच्यात अतितटीचा सामना झाला. भारताने फक्त 119 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पाकिस्तानचा संघ 113 धावा करू शकला आणि भारताने 6 धावांनी विजय मिळवला. या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पाँटिंगने भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं. दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळणाऱ्या अक्षर पटेल, ऋषभ पंत, कुलदीप यादव यांची भेट घेतली. त्यानंतर हार्दिक पांड्यासोबत वन टू वन झाला. त्यात त्यांचं छोटेखानी संभाषण झालं आणि त्याने आतापर्यंतच्या सर्व वादावर पडदा टाकला.

  • हार्दिक पांड्या : रिकी..! सर्वकाही कसं सुरू आहे? तुझं कुटुंब कसं आहे?
  • रिकी पाँटिंग : ते सर्व मस्त आहेत. खूप छान..तुझं कसं सुरु आहे?
  • हार्दिक पांड्या: सर्वकाही मस्त आणि गोड सुरु आहे.

वरील संभाषणावरून हार्दिक आणि नताशा यांच्यात सर्वकाही आलबेल असल्याचं स्पष्ट झालं आहे. हा व्हिडी एक दिवस रिकी पाँटिंगच्या आयुष्यातील या नावाने आयसीसीने यूट्यूवर शेअर केला आहे.