मुंबई : ते म्हणतात ना ‘दाग अच्छे हैं!’ (डाग चांगले आहेत!). आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) केलेलं लाखो रुपयांचं नुकसान असाच एक चांगला डाग आहे. आता तुम्ही म्हणाल कसं काय बुवा? तर मित्रांनो हार्दिकने केलेल्या नुकसानानेच गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात राजस्थानच्या पराभवाची स्क्रिप्ट तयार केली. याच नुकसानामुळे हार्दिक पंड्या सामन्याचा हिरो बनला. या नुकसानानंतरही गुजरातचा केवळ फायदाच झाला आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात नेमकं काय घडलं? गुजरात टायटन्सच्या कर्णधाराने केलेले लाखो रुपयांचे नुकसान काय? हे आता जाणून घ्या. गुजरातचं हे अमूल्य नुकसान झालं त्याला कारण म्हणजे हार्दिक पंड्याची चपळता. हार्दिक पंड्याचा वेग आणि चपळतेने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला (Sanju Samson) मात दिली. मात्र ते करत असताना हार्दिकने लाखोंचं नुकसानही केलं.
तर झाले असे की, राजस्थान रॉयल्सची दुसरी विकेट पडल्यानंतर त्यांचा कर्णधार संजू सॅमसन फलंदाजीला आला. क्रीझवर पाय रोवण्यासाठी त्याची धडपड सुरु होती. पण, त्याचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हार्दिक पंड्याने लाखो रुपयांचं नुकसान केलं.
संजू 11 धावा करून खेळत होता, तेव्हा एक धाव चोरण्याच्या प्रयत्न करत असताना हार्दिक पंड्याच्या वेगामुळे त्याला मात खावी लागली. चोरटी धाव मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजूला धावबाद करताना हार्दिक पंड्याने मधली यष्टीच (Stump) तोडली. त्याचा थेट थ्रो थेट मिडल स्टंपवर जाऊन आदळला. थ्रो इतका जलद होता की स्टम्प मधूनच तुटला. हार्दिकच्या या पराक्रमाने राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला डगआऊटचा रस्ता धरावा लागला. पण स्टंप तुटल्याने लाखो रुपयांचे नुकसानही झाले. कारण, आयपीएल किंवा पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलईडी स्टंपची किंमत लाखो रुपयांच्या घरात असते.
Hardik pandya Run out Sanju Samson and broken costly stump with lovely throw!
Hardik is now Orange Cap Holder now
Scored 87* not out ( man of the match) #GTvsRR #HardikPandya #IPL2022 pic.twitter.com/Qwdf4luXNb— Rahulsarsar (@Rahulsarsar177) April 14, 2022
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 24 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानवर 37 धावांनी ‘रॉयल’ विजय मिळवला. हार्दिक पंड्या या विजयाचा हिरो ठरला. या सामन्यात गुजरातने राजस्थानला विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य दिले होते. पण राजस्थानला निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 155 धावापर्यंतच मजल मारली. गुजरातकडून लॉकी फर्ग्युसन आणि डेब्यू करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालने (yash Dayal) प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. या विजयासह गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. स्पर्धेतील गुजरात टायटन्सचा हा पाच सामन्यांपैकी चौथा विजय आहे. राजस्थान रॉयल्सचा हा दुसरा पराभव आहे. राजस्थानने दमदार सुरुवात केली होती. पण ती लय त्यांना कायम राखता आलेली नाही.
इतर बातम्या
Purple Cap 2022 : पर्पल कॅप युजवेंद्र चहलकडे, जाणून घ्या कोणते खेळाडू आहेत टॉप 10 मध्ये
IPL 2022, SRH vs KKR : आज कोलकाता विरुद्ध हैदराबाद सनराइजर्स सामना, कोलकाता दुसरं स्थान कायम राखणार?