मुंबई : आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेत निवडलेल्या खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होतो. त्यामुळे या लीगमध्ये खेळण्याची प्रत्येक खेळाडूला आस असते. काही जणांना संधी मिळते, पण काही जणांची संधी हुकते. असं असताना आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी आयपीएलमधील हार्दिक पांड्याची डील चर्चेत आली आहे. 15 कोटी रुपये खर्च करून मुंबई इंडियन्सने हार्दिकला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्समधील पुनरागमनामुळे खेळाडूंमध्ये बिनसल्याची चर्चा रंगली आहे. जसप्रीत बुमराहच्या क्रिप्टिक पोस्टमुळे चर्चेला नवा रंग चढला आहे. दुसरीकडे, शुबमन गिल निष्ठेबाबत बोलल्याने त्याचा रोख हार्दिक पांड्याकडे असल्याचं सांगितलं जात आहे. आता हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्सने पोस्ट केलेला व्हिडीओ चर्चेत आहे. यात हार्दिक पांड्या रोहित, बुमराह, सूर्या, इशान, मलिंगा यांना तयारीला लागण्यास सांगत आहे.
“मी पुन्हा आलो आहे. रोहित, बुमराह, सूर्या, इशान,पॉलि, मलिंगा चला सुरु करूया. मुंबई इंडियन्स संघात पुनरागमन केल्याने खरंच आनंद झाला. 2015 पासून माझी क्रिकेट कारकिर्द मुंबई इंडियन्सकडून सुरु झाली. त्यांनी 2013 मला नोटीस केलं होतं. जेव्हा मी पाठी वळून पाहतो तेव्हा 10 वर्षांचा काळ डोळ्यासमोरून जातो.बरं वाटतं की मी पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये आलो. इथून क्रिकेट कारकिर्द सुरु झाली होती. त्यामुळे पुनरागमनचा आनंद आहे. माझे आकाश आणि पूर्ण कुटुंबासोबत चांगले संबंध आहेत. पलटण तुम्ही मला पहिल्यांदा सपोर्ट केला होता. आता मी पुन्हा एकदा सज्ज आहे. माझ्या हार्दिक स्वागतासाठी धन्यवाद.”, असं हार्दिक पांड्या या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.
Watch 𝐇𝐚𝐫𝐝𝐢𝐤 talk about his happy homecoming, teaming up with his 𝑜𝑙𝑑 𝑏𝑢𝑑𝑑𝑖𝑒𝑠 and resuming his journey with #MumbaiIndians 💙#OneFamily #MumbaiMeriJaan @hardikpandya7 pic.twitter.com/sm6dXGJYCI
— Mumbai Indians (@mipaltan) November 27, 2023
आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या 123 सामन्यात होता. पण 115 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. पण 39 सामन्यात फलंदाजी मिळाली नाही. त्याने आतापर्यंत 2309 धावा केल्या आहेत. यात 91 ही सर्वोत्तम खेळी आहे. हार्दिकने 10 अर्धशतकं झळकावली आहेत. तर गोलंदाजीत 53 गडी बाद केले आहेत.