Hardik Pandya Mumbai Indians | मुंबईत ‘हार्दिक’ स्वागत, पंड्याची घरवापसी

| Updated on: Nov 27, 2023 | 2:05 PM

Hardik Pandya in Mumbai IPL 2024 : आयपीएलमध्ये मोठा उलटफेर झालेला दिसत आहे. गुजरात संघाचा कॅप्टन असलेल्या हार्दिकला मुंबईने अखेर आपल्या ताफ्यात घेतलं आहे. रविवारी मोठा संभ्रम झाला होता मात्र रविवारी ऑफिशियल सर्वांनी याबाबत जाहीर केलं आहे.

Hardik Pandya Mumbai Indians | मुंबईत हार्दिक स्वागत, पंड्याची घरवापसी
Hardik Pandya Trade Mi IPL 2024
Follow us on

मुंबई : आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पंड्या परत एकदा मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. रविवारी सर्व संघांनी खेळाडू रिटेन आणि रिलीज केले होते. पंड्याला गुजरात संघाने रिली केलं नव्हतं, मात्र सोशल मीडियावर हार्दिक मुंबईतून खेळणार असल्याचं व्हायरल झालं होतं. मुंबईन हार्दिकला ट्रेड करत  संघात घेतलं आहे. रविवारी सर्वत्र याबाबत गोंधळ उडाला होता मात्र सोमवारी स्वत: हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सने याबाबत ऑफिशियल अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यासोबतच आयपीएलनेही याबाबत पोस्ट केलीये.

 

हार्दिक पंड्या याधीही मुंबई इंडियन्सकडून खेळला होता.  गुजरात संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेत थेट कर्णधार केल होतं.  पहिल्या सीझनमध्ये संघाला ट्रॉफी मिळवून दिलेली, दुसऱ्या पर्वामध्ये फायनलमध्ये धडक मारली होती. मुंबईने थेट कर्णधाराला ट्रेड करत आपल्या संघात परत एकदा घेतलं आहे. पलटणने कॅमेरून ग्रीनला आरसीबीला दिलं आहे.

 

हार्दिकला घेऊन आरसीबीला ग्रीन दिला त्यामुळे पर्समध्ये 2.25 कोटी आल्याने मुंबईकडे लिलावासाठी आता टोटल 17.50 कोटी झाले आहेत. 2015 च्या ऑक्शनमध्ये हार्दिक पंड्याला बेस प्राईजमध्ये 10 लाख मुंबई इंडियन्सने विकत घेतलं होतं. त्यानंतर पठ्ठ्याने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर सर्वांना आपली ताकत दाखवून दिली.

दरम्यान, हार्दिक पंड्याला घेण्यामाागे मोठा मास्टरप्लॅन असावा. रोहितनंतर हार्दिक पंड्याकडे संघाच्या नेतृत्व धुरा सोपवण्याच्या उद्देशाने इतकी मोठी रक्कम मुंबईने मोजली असावी. कारण हार्दिककडे गुजरात संघाचं कर्णधाकपद होतं त्यामुळे हार्दिक यंदा कॅप्टन नाही झाला तरी भविष्यात पलटणची धुरा त्याच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे.