हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने आता सर्वकाही देवावर सोडलं, क्रिप्टीक पोस्टमधून दिला असा मेसेज

| Updated on: May 26, 2024 | 3:38 PM

आयपीएल 2024 स्पर्धेचा शेवट होण्यापूर्वीच हार्दिक पांड्याच्या खासगी आयुष्यातील चर्चांना उधाण आलं आहे. अद्याप याबाबत फक्त सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. असं असतान हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा यांनी चर्चांवर कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे संशयाचं वादळ आणखी गडद होत चाललं आहे. असं असताना नताशाच्या आणखी एका क्रिप्टिक पोस्ट लक्ष वेधून घेतलं आहे.

हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने आता सर्वकाही देवावर सोडलं, क्रिप्टीक पोस्टमधून दिला असा मेसेज
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं. मात्र त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला हवं तसं यश मिळालं नाही. त्यामुळे हार्दिक पांड्या टीकेचा धनी झाला आहे. असं असताना त्याच्या खासगी आयुष्यातही वादळ आल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टॅन्कोविक यांच्यात बिनसल्याचं सांगण्यात येत आहे. एकीकडे या चर्चा रंगल्या असताना हार्दिक आणि नताशा यांच्याकडून कोणतंही थेट भाष्य करण्यात आलेलं नाही. त्यामुळे सुरु असलेल्या चर्चा खऱ्या की खोट्या असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. असं असताना हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविक हीच्या क्रिप्टिक पोस्टने चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. या पोस्टच्या माध्यमातून नताशाने देवाची आठवण काढली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी झाल्याच्या संशयाला बळ मिळत आहे.

नताशा स्टॅन्कोविक आणि हार्दिक पांड्या 2020 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. या दोघांना एक मुलगाही आहे. त्या मुलाचं नाव अगस्त्य ठेवलं आहे. त्यानंतर गेल्या वर्षी 2023 मध्ये दोघांनी मोठ्या थाटामाटात दुसऱ्यांदा लग्नसोहळा साजरा केला होता. मग मागच्या सहा महिन्यात असं काय झालं की हे दोघं एकमेकांबाबत बोलतानाा दिसत नाही. नताशाने तिच्या इंस्टा बायोमधून पांड्या हे आडनावही काढून टाकलं आहे. दुसरीकडे, आयपीएल स्पर्धेत हार्दिककडे मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद असूनही सामना पाहण्यास आली नव्हती. आता असं सर्व होत असातना नताशाची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल होत आहे.

नताशाने इंस्टा स्टोरीवर प्रभू येशू आणि कोकरूचा फोटो शेअर केला आहे. कोकरू पुढे चालत आहे आणि प्रभू येशू त्याच्या मागे आहेत. या फोटोला नताशाने कोणतीही कॅप्शन दिलेली नाही. पण या फोटोचा अर्थ जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने लावत आहे. अनेकांनी वाईट काळात देवाची आठवण येते अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काही जणांनी आयुष्यातील खडतर प्रवासात पुढे जात असताना पाठी देव असतो असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

कृणाल पांड्याने नुकताच हार्दिक-नताशा यांचा मुलगा अगस्त्यचा फोटो नुकताच पोस्ट केला होता. या फोटोला नताशाने हार्ट इमोजी देत प्रतिक्रिया दिली होती. नताशा स्टॅन्कोविक ही एक अभिनेत्री असून तिने 2013 मध्ये अजय देवगनच्या सत्याग्रह चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तसेच एक्शन जॅक्शन, झिरो या चित्रपटांमध्ये कॅमिओही केलं आहे. नताशाने बिग बॉस, नच बलिए या रिएलिटी शोमध्येही भाग घेतला होता. मात्र लग्नानंतर ती रुपेरी पडद्यापासून दूर होती.