मुंबई | विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये हरियाणाने संघाने राजस्थानचा पराभव केला आहे. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर फायनल सामना पार पडला. हरियाणा संघाने टॉस जिंकत प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना हरियाणाने 50 ओव्हरमध्ये 287-5 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 257 धावांवर ऑल आऊट झाला. हरियाणा संघाने फायनल सामना 30 धावांनी विजय मिळवला आहे.
हरियाणा संघ बॅटींगला उतरला तेव्हा काही खास सुरवात करू शकला नाही. दुसऱ्याच ओव्हरमध्ये युवराज सिंह १ धाव करून परतला होता. त्यानंतर हिमांशू राणा 20 धावा काढून बाद झाला. तिसऱ्या विकेटसाठी हरियाणा संघाकडून अंकित कुमार आणि अशोक मेनारिया यांनी संघाचा डाव सावरला होता. संघाला संकटातून बाहेर काढत चांगली भागादारी केलेली. राजस्थान संघाला तिसऱ्या विकेटसाठी 35 व्या ओव्हरची वाट पाहावी लागली.
राजस्थान संघाला अनिकेत चौधरी याने आणखी एकदा यश मिळवून देत सामन्यात कमबॅक करून दिलं. अंकित कुमार याला ८८ धावांवर बोल्ड केलं. त्याच्यापाठोपाठ अशोक मेनारियाही ७० धावांवर बाद झाला. त्यानंतर कोणतीही मोठी भागीदारी झाली नाही. रोहित शर्मा २० धावा, निशांत सिंधू २९ धावा, राहुल तेवतिया २४ धावा आणि शेवटला सुमित कुमार याने नाबाद २८ धावांची आक्रमक छोटेखानी खेळी करत संघाची धावसंख्या 280 च्या वर पोहोचवली. राजस्थान संघाकडून अनिकेत चौधरीने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर अराफत खानने २ विकेट आणि राहुल चहरने १ विकेट घेतली.
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानची सुरूवातही खराब झालेली, सलामीवीर राम चौहान याला सुमित कुमार याने बोल्ड करत पहिला धक्का दिलेला. त्यानंतरही दोन मोठ्या विकेट घेत सुमितने राजस्थान संघाला बॅकफूटवर ढकललं होतं. माहिपाल लोमरोर १ धाव, कॅप्टन दिपक हुड्डालाही सुमितने माघारी आऊट केलं. १२ धावांवर राजस्थान संघाच्या तीन विकेट गेल्या होत्या.
करन लाम्बा आणि अभिजीत तोमर यांनी डाव सावरला असं वाटत असताना राहिल तेवतियाने लाम्बाला बोल्ड करत चौथा धक्का दिला. त्यानंतर अभिजीत तोमर आणि कुणाल सिंह राठोर यांच्यात चांगली भागीदारी पाहायला मिळाली. दोघे सामना जिंकवतात असं वाटलं होतं मात्र तसं काही झालं नाही. हर्षल पटेल याने तोमर याला ८० धावांवर असतानाबाद करत हरियाणाला सामन्यात कमबॅक करून दिलं. त्यानंतर कोणतीही भागीदारी पाहायला मिळाली नाही. अवघ्या ५७ धावांमध्ये पाच विकेट गमावलेल्या राजस्थान संघाचा फायनलमध्ये पराभव झाला. हरियाणाकडून सुमित कुमार आणि हर्षेल पटेल यांनी सर्वाधिक तीन तर राहुल तेवतिया आणि अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
हरियाणा (प्लेइंग इलेव्हन): युवराज सिंग, अंकित कुमार, हिमांशू राणा, निशांत सिंधू, रोहित परमोद शर्मा (w), राहुल तेवतिया, अशोक मेनारिया (C), सुमित कुमार, हर्षल पटेल, अमित राणा, अंशुल कंबोज.
राजस्थान (प्लेइंग इलेव्हन): अभिजीत तोमर, राम मोहन चौहान, महिपाल लोमरोर, दीपक हुडा (C), करण लांबा, कुणाल सिंग राठोर (W), राहुल चहर, अनिकेत चौधरी, अराफत खान, खलील अहमद, कुकना अजय सिंग