मुंबई : वन डे वर्ल्ड कप 2023 सुरू व्हायला अवघे काही दिवस बाकी असताना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कोर्टात हजर झाला होता. मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाने त्याच्यासह परिवारावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. हे प्रकरण अद्याप कोर्टात असून मोहम्मद शमीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मोहम्मद शमी भारतीय संघाच्या मुख्य गोलंदाजांपैकी एक असून आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर कोर्टात गेल्याने चाहेत चिंतेत पडले.
मोहम्मद शमीला बुधवारी कोर्टात हजर राहण्याचे आदेश होते. त्याप्रमाणे शमी कोलकाताच्या अलीपूर कोर्टात हजर राहत त्याने 2000 रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन घेतला. यावेळी मोहम्मद शमीसोबत त्याचा हसीब अहमदही कोर्टामध्ये त्याच्यासोबत उपस्थित होता. शमीला जामीन मिळाल्यावर त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
हसीन जहांने शमीला टॅग करत पोस्टमध्ये, भारतामध्ये कायद्यापेक्षा काहीच मोठं नाही. एवढ्या मोठ्या क्रिकेटपटूला जामीन घेण्यासाठी न्यायलयात हजर रहावं लागलं यावरून भारतातील कायदा कोणासमोरच झुकत नाही हे सिद्ध झाल्याचं हसरत जहांने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इतका मोठा खेळाडू असून त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण जामीनासाठी त्याला न्यायालयातच जावं लागलं. काही विकल्या गेलेल्या माध्यमांनी त्याला दिलासा म्हटलं असलं तरी माझ्या नजरेत त्याचा माज मोडला असल्याचंही हसरत जहां म्हणालीय.
दरम्यान, 2018 साली मोहम्मद शमी याची पत्नी हसरत जहांने त्याच्यासह परिवारावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शमीविरोधात कारवाई करण्यात आली होती. अजूनही हे प्रकण कोर्टात असून शमीला बुधवारी जामीन मिळाला आहे. वर्ल्ड कपआधी मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेमध्ये खेळताना दिसेल. आता पार पडलेल्या आशिया कपवर भारताने नाव कोरलं असून भारतीय संघाचा मोहम्मद शमी महत्त्वाचा खेळाडू होता.