Kohli vs Gambhir : विराट कोहलीचं नाव ऐकताच गौतम गंभीरच्या तळपायाची आग मस्तकात, केलं असं की…Watch Video

| Updated on: May 04, 2023 | 6:07 PM

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील भांडण सर्व जगाने बघितलं. भांडणाची अनेक कारणं देखील समोर आली आहेत. पण 48 उलटून गेले तरी गौतम गंभीरचा राग काही कमी झालेला नाही.

Kohli vs Gambhir : विराट कोहलीचं नाव ऐकताच गौतम गंभीरच्या तळपायाची आग मस्तकात, केलं असं की...Watch Video
Kohli vs Gambhir : विराट कोहलीचा जयघोष सुरु होताच गौतम गंभीर थांबला आणि काय केलं पाहा Video
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

मुंबई : कोणताही खेळ म्हंटलं की खेळाडूंचा आक्रमकपणा आलाच. मग यातून क्रिकेट तरी दूर कसं राहणार. मैदानात खेळाडूंना डिवचून मन विचलीत करण्यासाठी अनेक खेळाडू फायदा घेतात. हे आपण वारंवार पाहिलं आहे. पण सामना झाला की राग निवळतो आणि खेळ भावना जागी होते. पण विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद सामना संपल्यानंतर झाला. बीसीसीआयने दोघांवर दंडात्मक कारवाई देखील केली आहे. पण असं असताना 48 तास उलटून गेले तरी राग काही शांत व्हायचं नाव घेत नाही. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. यात विराट कोहलीच्या नावाची घोषणाबाजी होताच गौतम गंभीरच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

आयपीएल 2023 स्पर्धेत 45 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झाला. हा सामना पावसामुळे रद्द झाला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. या सामन्यानंतरचा एक व्हिडीओ आता व्हायर होत आहे. त्यात फॅन्स गौतम गंभीरला डिवचताना दिसत आहे.

लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर पायऱ्या चढत स्टँडमध्ये जात होता. त्यानंतर उपस्थित असलेल्या विराट कोहलीच्या चाहत्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. कोहलीच्या नावाचा जयजयकार ऐकून गंभीर मागे आला आणि फॅन्सकडे रागाने पाहू लागला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ कट्टर प्रतिस्पर्धी बनले आहेत. दोन सामन्यातील आक्रमकपणा पाहून दोन्ही संघाचे चाहते याकडे अशाच नजरेने पाहात आहेत. आयपीएल 2023 स्पर्धेत 10 एप्रिल रोजी आरसीबी विरुद्ध एलएसजी यांच्यातील सामना झाला.

बंगळुरु विरुद्धचा सामना लखनऊने 1 विकेटने जिंकल्यानंतर लखनऊच्या खेळाडूंनी आक्रमकपणे आनंद साजरा केला. एलएसजी संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने आरसीबीच्या चाहत्यांना तोंडावर बोट गप्प बसण्याचा इशारा केला होता.

आरसीबीने दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाचा पराभव करून वचपा काढला. विशेषत: विराट कोहलीने गौतम गंभीरप्रमाणे तोंडावर बोट ठेवून तशीच कृती केली. सामन्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली.

प्लेऑफमध्ये हे दोन संघ पुन्हा भिडण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं तर नक्कीच या दोन्ही संघाचा सामना होऊ शकतो. क्वालिफायर किंवा एलिमिनेटर सामन्यात भिडू शकतात.

अंतिम फेरीतही दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. पण त्या आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांना प्लेऑफमध्ये पोहोचायचे आहे. त्यानंतरच दोन्ही संघांचा आमने-सामने येण्याचा निर्णय होईल.