IND vs PAK Semi Final । पाकिस्तान संघाचं नशीब फळफळलं, भारत-पाक सेमी फायनल होण्याची शक्यता, फक्त…

| Updated on: Nov 07, 2023 | 3:33 PM

IND vs PAK Semi final odi World cup 2023 : पाकिस्तान संघ अजुनही स्पर्धेत टिकून आहे, भारत-पाक सेमी फायनल होणार नाही असं दिसून आलं होतं. मात्र आता पाकिस्तान संघाचं नशीब उचकटल्याचं दिसून आलं आहे. नेमकं असं काय झालं आहे की आता भारत पाक सेमी फायनल सामना होऊ शकतो.

IND vs PAK Semi Final । पाकिस्तान संघाचं नशीब फळफळलं, भारत-पाक सेमी फायनल होण्याची शक्यता, फक्त...
Follow us on

मुंबई : वर्ल्ड कप2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान सेमी फायनल सामना व्हावी अशी प्रत्येक क्रिकेट चाहत्याची इच्छा आहे. मात्र त्यासाठी न्यूझीलंड संघाचा श्रीलंकेकडून पराभव होणं गरजेचं आहे. किंवींचा संघही सेमी फायनलच्या रेसमध्ये आहे. श्रीलंका संघाच्या तुलनेत न्यूझीलंडचा संघ वरचढ आहे. पण तरीही पाकिस्तान संघाचं नशीब त्यांना चांगली साथ देत असल्याचं दिसत आहे. नेमंक आहे तरी कसं शक्य? जाणून घ्या.

न्यूझीलंड संघाला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी श्रीलंकेलविरूद्धचा सामना जिंकावा लागणार आहे. पण जर हा सामनाच झाला नाहीतर मग पुढचं गणित कसं असणार? पाकिस्तान संघावर वरूणराजाची चांगलीच कृपा असल्याचं दिसत आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड संघाचा पुढचा सामना बंगळुरूमधील चिन्नास्वामी मैदानावर हा सामना पार पडणार आहे. मात्र गेल्या 24 तासांपासून बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तिथल्या रस्त्यांवरही पाणी साचलं आहे.

 

 

पाकिस्तान आणि इंग्लंड संघाचा 11 नोव्हेंबरला सामना होणार आहे. या दिवशीही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर त्याा दिवशी पावसाने हजेरी लावली अन् सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात येणार आहे. याचा परिणाम असा होणार न्यूझीलंडचे 9 गुण होणार आणि तर श्रीलंका आधीच बाहेर झाली आहे. पण यामुळे पाकिस्तान संघाचा सेमी फायनलसाठीचा रस्ता मोकळा होणार आहे.

दरम्यान, पाकिस्तान  संघाला इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात फक्त विजय मिळवावा लागणार आहे. सेमी फायनलमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान असा समावेश होऊ शकतो. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानचा सेमी फायनल सामना होऊ शकतो. यामध्ये फक्त अफगाणिस्तान संघ त्यांचे दोन सामने हरायला हवा, नाहीतर अफगाणिस्तानच सेमी फायनल एन्ट्री करू शकतो.