IND vs PAK : भारताचा पराभव, पाकिस्तान 5 ओव्हरमध्येच 121 धावा करत 6 विकेट्सने विजयी

| Updated on: Nov 01, 2024 | 1:09 PM

India vs Pakistan Match Result Hong Kong Sixes 2024 : पाकिस्तानने कट्टर प्रतिस्पर्धी टीम इंडियाचा 6 विकेट्सने धुव्वा उडवत विजयी सुरुवात केली आहे.

IND vs PAK : भारताचा पराभव, पाकिस्तान 5 ओव्हरमध्येच 121 धावा करत 6 विकेट्सने विजयी
HK Sixes 2024 robin uthappa vs Pakistan
Image Credit source: HongKongSixes X Account
Follow us on

हाँगकाँग क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाची पराभवाने सुरुवात झाली आहे. टीम इंडियाला कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. पाकिस्तानने टीम इंडियावर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.या 6 षटकांच्या सामन्यात पाकिस्तानने विजयी आव्हान हे एकही विकेट न गमावता 1 ओव्हरआधीच पूर्ण केलं. पाकिस्तानने यासह विजयी सलाम दिली आहे. पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांचं आव्हान मिळालं होतं. पाकिस्तानने हे आव्हान सहज पूर्ण केलं.

पाकिस्तानची बॅटिंग

पाकिस्तानसाठी आसिफ अली याने सर्वाधिक धावा केल्या. आसिफने 14 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 2 फोरसह 55 रन्स केल्या. त्यानंतर आसिफ अली रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. त्यानंतर मुहम्मद अखलाक आणि कॅप्टन फहीम अश्रफ या जोडीने पाकिस्तानला विजयापर्यंत नेलं. मुहम्मद अखलाक याने 12 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 40 रन्स केल्या. तर फहीमन 5 बॉलमध्ये 1 फोर आणि 3 सिक्स ठोकून 22 रन्स केल्या. टीम इंडियाकडून एकाहाली विकेट घेता आली नाही.

टीम इंडियाची बॅटिंग

त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने 6 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 119 रन्स केल्या. भरत चिपली याने सर्वाधिक 53 धावा केल्या आणि रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर गेला. कॅप्टन रॉबिन उथप्पा याने 8 चेंडूत 3 षटकार आणि तितक्याच चौकारांसह 31 धावा केल्या. केदार जाधव याने 8 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर मनोज तिवारी आणि स्टूअर्ट बिन्नी जोडी नाबाद परतली. मनोजने 17 आणि स्टूअर्टने 4 धावा केल्या. पाकिस्तानकडून आमेर यामिन यानेच दोन्ही विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानची विजयी सुरुवात

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी टीम इंडिया : रॉबिन उथप्पा (कर्णधार), केदार जाधव, मनोज तिवारी, शाहबाज नदीम, भरत चिपली, श्रीवत्स गोस्वामी आणि स्टुअर्ट बिन्नी.

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी पाकिस्तान टीम : फहीम अश्रफ (कॅप्टन), आमेर यामिन, आसिफ अली, दानिश अझीज, हुसैन तलात, मुहम्मद अखलाक आणि शाहाब खान.