IND vs ENG : गयानाच्या खेळपट्टीवर भारत आणि इंग्लंडची कशी आहे कामगिरी? जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड

| Updated on: Jun 26, 2024 | 10:34 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची करो या मरोची लढाई आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला काहीही करून उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूरत करावं लागणार आहे. पण गतविजेत्या इंग्लंड संघाला पराभूत करणं वाटतं तितकं सोपं नाही. या दोन संघांची आतापर्यंत एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी आहे? गयानाची खेळपट्टीने कोणाला साथ दिली ते जाणून घेऊयात

IND vs ENG : गयानाच्या खेळपट्टीवर भारत आणि इंग्लंडची कशी आहे कामगिरी? जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. या सामन्यावर संपूर्ण क्रीडाविश्वाचं लक्ष लागून आहे. कोण बाजी मारणार आणि अंतिम फेरीत स्थान मिळवणार याची उत्सुकता आहे. भारत इंग्लंड यांच्यातील सामना 27 जूनला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता होणार आहे.गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमच्या खेळपट्टीवर हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. ही खेळपट्टी कोणासाठी लकी ठरेल,याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही संघ या मैदानात सामने खेळले आहेत. तसेच ही खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी ठरली आहे. प्रोव्हिडन्स मैदानात एकूण 34 टी20 सामने झाले आहेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ 16 वेळा, तर धावांचा पाठलाग करणारा संग 14 वेळा जिंकला आहे. या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना सरासरी 127 धावांची आहे. तर धावांचा पाठलाग करताना सरासरी 95 धावांची आहे.

टीम इंडिया गयानाच्या प्रोव्हिडन्स मैदानात आतापर्यंत 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यापैकी टीम इंडियाने 2 सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर इंग्लंडने या मैदानात एकूण दोन टी20 सामने खेळले आहेत. यापैकी एक सामना डकवर्थ लुईस नियमानुसार गमावला होता. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे या खेळपट्टी आकडेवारीनुसार भारताचं वर्चस्व असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, दोन्ही संघ टी20 क्रिकेटमध्ये 23 वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने 12 वेळा, तर इंग्लंडने 11 वेळा विजय मिळवला आहे. तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ 4 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी 2 सामन्यात भारताने, तर दोन सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. 2007 वर्ल्डकप स्पर्धेत भारातने इंग्लंडला 18 धावांनी पराभूत केलं होतं. 2009 मध्ये इंग्लंडने भारताचा 3 धावांनी पराभव केला होता. 2012 मध्ये भारताने इंग्लंडला 90 धावांनी पराभूत केलं होतं. तर 2022 मध्ये इंग्लंडने उपांत्य फेरीत भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता.

दोन्ही संघातील खेळाडू

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज , यशस्वी जयस्वाल.

इंग्लंड संघ: फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपली, मार्क वुड, बेन डकेट, विल जॅक्स, टॉम हार्टले.