टीम इंडियाचा उपकर्णधार आणि स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या गेल्या काही दिवसांपासून वैवाहिक जीवनामुळे चांगलाच चर्चेत आहे. हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी अभिनेत्री नताशा स्टेन्कोविक या दोघांमध्ये बिनसल्याचं असून लवकरच घटस्फोट होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अद्याप नताशा आणि हार्दिक या दोघांनी या अफवा-चर्चांबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. अशात हार्दिक पंड्या आता टीम इंडियासह अमेरिकेत टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळत आहेत. हार्दिकने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामन्यात बांगलादेश विरुद्ध 23 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 40 धावांची नाबाद खेळी केली. हार्दिक पंड्याने या सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली. हार्दिकच्या प्रतिक्रियेचं संबंध नेटकरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यासह जोडत आहेत.
“मी कधीही यापासून दूर जाणार नाही. लढा कायम ठेवणार. मला वाटतं की तुम्ही खेळ किंवा मैदान अर्थात लढा देणं सोडता, तर तुम्हाला तुमच्या खेळातून ते मिळणार नाही जे तुम्हाला अपेक्षित आहे किंवा तो परिणाम मिळणार नाही, ज्याच्या तुम्ही शोधात आहात. मला असं वाटतं की तुम्ही अखेरपर्यंत लढ्यात कायम रहावंच लागेल”, असं हार्दिक पंड्याने स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना म्हटलं.
“हो हे माझ्यासाठी अवघड राहिलं आहे.मात्र मी यापासून प्रेरित आहे. मी माझ्या दिनक्रम कायम राखण्याचा प्रयत्न केलाय, ज्यानुसार मी आधी सर्व काही करायचो. हे असं सर्व होत राहतं.चांगली-वाईट वेळ येत जात असते. मी अशा परिस्थितीतून गेलो आहे. मी लवकरच यातून बाहेर पडेन”, असंही पंड्याने म्हटलं.
हार्दिकचा रोख नताशाकडे?
Hardik Pandya said “I don’t take my success seriously – whatever I have done well, I have forgotten about them immediately and move forward – same with difficult times, I don’t run away from it. I face everything with my chin up, as they say, this too shall pass”. [Star Sports] pic.twitter.com/rMxKVY7JcL
— Johns. (@CricCrazyJohns) June 2, 2024
“मी यशाबाबत फार गांभीर्याने विचार करत नाहीत. मी जे काही करतो चांगलं करतो, मी झालंय ते विसरुन पुढे निघालो आहे. वाईट वेळेबाबतही असंच आहे. मी वाईट वेळेपासून दूर पळत नाही. मी प्रत्येक परिस्थितीचा सामना करतो. ही पण वेळ निघून जाईल. त्यामुळे अशा परिस्थितीतून बाहेर येणं सरळ आहे. फक्त ते आपल्याला स्वीकार करायलं हवं. कठोर मेहनत कधीच वाया जात नाही”, असंही पंड्याने सांगितलं.