IND vs PAK : डेंग्यूत दोन सामने खेळलो, कँसर होता आता तू तयार राहा! युवराज सिंग याचा शुबमनला कानमंत्र

| Updated on: Oct 12, 2023 | 9:15 PM

World Cup 2023, IND vs PAK : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरु आहे. पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला पराभूत केलं. आता भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यापूर्वी युवराज सिंग याने शुबमन गिल याला कानमंत्र दिला आहे.

IND vs PAK : डेंग्यूत दोन सामने खेळलो, कँसर होता आता तू तयार राहा! युवराज सिंग याचा शुबमनला कानमंत्र
IND vs PAK : युवराज सिंगकडून शुबमन गिल याला बुस्टर डोस, म्हणाला 'मला तर कँसर होता आणि...'
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वा टीम इंडियाची चांगली सुरुवात झाली. पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया आणि दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत केलं. या दोन्ही सामन्यात फॉर्मात असलेला शुबमन गिल खेळला नाही. डेंग्यू झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे रोहित शर्मा याच्यासोबत इशान किशन याने ओपनिंग केली. आता पाकिस्तान विरुद्ध 14 ऑक्टोबरला सामना होणार आहे. या सामन्यात शुबमन गिल खेळणार की नाही याबाबत शंका आहे. दुसरीकडे, शुबमन गिल अहमदाबादला पोहोचला असून त्याने नेट प्रॅक्टिस सुरु केल्याने चाहत्यांमध्ये आनंद आहे. त्यात आता युवराज सिंगचं एक मोठं वक्तव्य समोर आलं आहे. त्यामुळे नक्कीच शुबमन गिल याला प्रेरणा मिळेल, असं चाहते सांगत आहेत.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये भारत पाकिस्तान सामना होणार आहे. या सामन्याची प्रचंड उत्सुकता क्रीडाप्रेमींना आहे. या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने गुरुग्राममध्ये एएनआयशी संवाद साधला. यावेळी शुबमन गिल याला कानमंत्र दिल्याचं सांगितलं. ‘मी त्याला बोललो मी दोन सामने डेंग्यूत खेळलो आणि मी कँसरमध्ये वर्ल्डकप खेळलो आहे. आता तू रेडी राहा. आशा आहे की भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात खेळेल.’

‘जेव्हा तुम्हाला ताप किंवा डेंग्यू झाला असेल तर खेळणं खूपच कठीण असतं. मी याचा अनुभव घेतला आहे. मला आशा आहे की तो फिट झाला तर नक्कीच खेळेल’, असंही युवराज सिंग याने पुढे सांगितलं. शुबमन गिल फॉर्मात असल्याने पुढच्या सामन्यात नक्कीच टीम इंडियाला फायदा होईल अशी आशा आहे.

रोहित शर्मा कोणताही रेकॉर्ड तोडू शकतो

‘रोहित शर्मा कोणताही रेकॉर्ड मोडू शकतो. मला वाटतं त्यात इतकी क्षमता आहे की, कोणताही रेकॉर्ड मोडू शकेल. निश्चितच तो एक महान खेळाडू आहे. त्याने 31 वनडे शतक ठोकले असून ही मोठी कामगिरी आहे. मला आशा आहे की, कर्णधार म्हणून भारताला वर्ल्डकप जिंकून देईल. त्याने दुसऱ्या सामन्यात चांगली फलंदाजी केली.’