Joe Root : सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याबाबत जो रुट काय म्हणाला? व्हीडिओ

| Updated on: Sep 01, 2024 | 9:06 PM

Joe Root Reaction on Sachin Tendulkar World Record: सध्या क्रिकेट विश्वात इंग्लंडच्या जो रुट याचीच चर्चा पाहायला मिळतेय. रुटने लॉर्ड्स कसोटीतील दोन्ही डावात शतकी खेळी करत धमाका केलाय.

Joe Root : सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याबाबत जो रुट काय म्हणाला? व्हीडिओ
joe root england lords
Image Credit source: England Cricket X Account
Follow us on

इंग्लंडचा फलंदाज जो रुट याने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 34 वं शतक ठोकलं. जो रुट यासह एलिस्टर कूक याला मागे टाकत इंग्लंडसाठी सर्वाधिक शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. आता रुटला सचिन तेंडुलकर याच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विश्व विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. रुटला ते इतक्यात शक्य नसलं तरी ते येत्या काही महिन्यांमध्ये शक्य होईल, असं एकंदरीत चित्र आहे. सचिनच्या नावावर 15 हजार 921 धावा आहेत.तर रुटने आतापर्यंत 12 हजार 377 धावा केल्या आहेत. रुट सध्या ज्या वेगाने धावा करतोय, त्या हिशोबाने तो सचिनला मागे टाकू शकतो. जो रुटने शतकी खेळीनंतर स्वत:च प्रतिक्रिया दिली आहे.

जो रुटने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये दोन्ही डावात शतकं ठोकली. रुट 34 व्या शतकानंतर सचिनच्या विक्रमाजवळ पोहचला आहे. त्यावरुन रुटला प्रश्न करण्यात आला. तुझं लक्ष हे सचिनच्या विक्रमावर आहे का? असा प्रश्न रुटला करण्यात आला. “मला फक्त खेळायचं आहे. मी टीमसाठी योगदान देऊ इच्छितो आणि शक्य तेवढ्या धावा करायच्या आहेत. शतकं करणं ही एक अभिमानास्पद बाब आहे. कसोटी क्रिकेटमध्ये टीमच्या विजयापेक्षा सर्वोत्तम काहीच नाही. सोबतच संघासाठी योगदान देता येईल, इतकाच माझा फोकस आहे. मी याच मानसिकतेने खेळतो. पुढेही असाच खेळत राहेन, अशी माझी मानसिकता आहे”, असं रुटने म्हटलं.

रुटने 34 वं शतक ठोकलं तेव्हा एलिस्टर कूक स्टेडियममध्ये होता. रुटने कूकसमोर त्याचा रेकॉर्ड् उध्वस्त केला. रुटला या संदर्भात केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना क्रिकेटरने म्हटलं की, “एलिस्टर कूकने खूप काही दिलंय. कूकने मला माझ्या कारकीर्दीत फार मदत केली आहे. तो सपोर्टिव्ह आहे”.

रेकॉर्ड्स रांग

रुटने 34 व्या शतकासह अनेक विक्रम उध्वस्त केले. रुटने एलिस्टर कूक याने 2 रेकॉर्ड ब्रेक केले. रुटने कूकचा इंग्लंडकडून सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडीत काढला. तसेच रुट आता श्रीलंकेविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. रुटने त्याबाबत कूकचा रेकॉर्ड ब्रेक केला. रुट लॉर्ड्समध्ये दोन्ही डावात शतकं करणारा चौथा इंग्रज फलंदाज ठरला. तसेच रुटच्या नावावर आता लॉर्ड्समध्ये सर्वाधिक शतकांच्या विक्रमाची नोंद झाली आहे.

जो रुट काय म्हणाला?

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रथनायके.