टी20 वर्ल्डकप स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेविड मिलरने उत्तुंग फटका मारला. टीव्हीवर कॅमेरा अँगल पाहून सर्वांचीच धडधड वाढली होती. हा चेंडू थेट सीमापार गेला असा अनेकांना वाटलं होतं. पण अचानक सूर्यकुमार यादव आला आणि मिलरची विकेट घेऊन गेला. कोणाला काय झालं ते कळलंच नाही. इतक्या वेगाने ही घटना घडली. खरंतर लाईव्ह कॅमेऱ्याचा अँगलमुळे कळायला मार्ग नव्हता. पण अॅक्शन रिप्लेमध्ये सर्वकाही स्पष्ट झालं आणि तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केलं. सूर्यकुमार यादवच्या या झेलची सर्वच ठिकाणी चर्चा होत आहे. अप्रतिम झेलचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. सूर्यकुमार यादव ही कामगिरी करून जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये जात होता, तेव्हा टाइम्स ऑफ इंडियाने त्याला या क्षणाबाबत विचारलं. तेव्हा सूर्यकुमार यादवने सांगितलं की, “माझ्या मनात नेमकं काय सुरु होतं हे मला माहिती नाही. मला फक्त वर्ल्डकप उडताना दिसत होता आणि मी तो दोन हातात पकडला.”
वर्ल्डकप इतिहासात जेव्हा कधी सर्वोत्तम झेलची चर्चा होते तेव्हा पहिलं नाव येतं ते कपिल देवचं. त्याने 1983 वनडे वर्ल्डकपमध्ये विव रिचर्ड्सचा अप्रतिम झेल घेतला होता. सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिनी या संघात होते. सर्वाधिक विकेट घेण्याचा मान त्यांना मिळाला होता. त्यांनीही सूर्यकुमार यादवच्या झेलचं कौतुक केलं आहे. त्यांनी सांगितलं की, “सूर्याचा कॅप कपिल देव इतकाच जबरदस्त आहे. कपिल देव मागे धावत गेला आणि झेलं पकडला. हे खरंच कठीण होतं. पण सूर्याला येथे सीमेवर लक्ष ठेवून कॅच पकडण्याची कसरत करायची होती.”
The match-winning catch by Suryakumar Yadav pic.twitter.com/qQpjGSDMtu
— Ashok Bijalwan अशोक बिजल्वाण 🇮🇳 (@AshTheWiz) June 29, 2024
Kapil Dev's catch of Viv Richards in the 1983 World Cup.
Suryakumar Yadav's catch of David Miller in the 2024 T20 World Cup.
– Two iconic catches in Indian cricket history! 🇮🇳 pic.twitter.com/aJvptwQUtC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 30, 2024
#WATCH | On being asked about Suryakumar Yadav's catch, Indian team fielding coach TK Dilip says, "He would have already taken 50 catches like that in the practice…The awareness of the rope is very important and having the confidence that he can throw it and catch it. It was a… pic.twitter.com/bNpKMEvKt3
— ANI (@ANI) June 30, 2024
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टीके दिलीप यांनी सांगितलं की, “सूर्यकुमार यादवने 50 झेलं सरावादरम्यान पकडले होते. पण त्यावेळे सीमारेषेचं भान ठेवून चेंडू आत फेकायचा आणि परत तो आत येऊन पकडायचा त्याचा आत्मविश्वास वाखण्याजोगा आहे. त्यावेळी त्याने दाखवलेली समयसूचकता खरंच खूपच महत्त्वाची आहे. त्याबाबत सांगणं खूपच कठीण आहे.”